२१ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात विनोद पाटील यांच्या मराठा आरक्षणावरील कालमर्यादा याचिकेवर सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला विचारले की, आपल्याला अहवाल सादर झालेला आहे का? त्यावर राज्य सरकारने खुलासा दिला की, अहवाल सादर झाला आहे व कॅबिनेटने स्वीकारला असून यावर आम्ही तात्काळ निर्णय घेऊ.
याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वकिलांनी सरकारला विचारले की, मराठा आरक्षणाचा कायदा हा घटनेत टिकणारा असावा. विनाकारण घटनाबाह्य कायदा करून व घटनेत न टिकणारा असेल तर तो पुन्हा एकदा मराठ्यांना नुकसान देणारा असेल.
0 टिप्पण्या