अवैध धंदे करणाराची कर्दनकाळ ठरलेल्या DYSP नवटाके म्यडम षडयंत्राच्या बळी?

माजलगाव येथील DYSP भाग्यश्री नवटाके यांचा सोशल मिडिया वर व्हायरल होत असलेला व्हिडीओ दलित व एट्रासिटी विरोधी असल्याचे बोलले जाते. सदरील व्हिडीओची  सत्यता तपासणी अंती नक्कीच समोर येईल. त्यांच्या सध्या सोशल मिडियावर अनेकांनी टिकेची झोड उठवली आहे. या प्रकरणाची दुसरी बाजू ही तपासणे गरजेचे असल्याने काही स्थानिका सोबत चर्चा केली असता माजलगाव या ठिकाणी रुजू झाल्यापासुनच अनेक अवैध धंदे करणारे माफीया, वाळू तस्कर , गुंड यांच्या वर कायद्यची दहशत निर्माण करुन अनेक अवैध बाबींना आळा घातल्याचे दिसून येते. या प्रकरणात अवैध धंदा करणारा कोणत्या जातीचा आहे. हे त्यांनी कधीच पाहिले नाही त्यात सर्व समाजाचे अवैध धंद्यावाल्यांचा समावेश आहे. एखाद्या प्रकरणात गोर-गरीबांवर जर केसेस होत असतील तर दोन्ही बाजुंच्या लोकांना बसवून जो चुकीचा वागतोय असं लक्षात आलं तर त्याला कायदेशीर समज देऊन अनेक प्रकरणे ठाण्यातच मिटवली. यात त्यांचा हेतू प्रामाणिक असे. विनाकारण केसेस झाल्यातर त्या कुटुंबाची वाताहत होते. आर्थिक नुकसान होते. आणि यातूनच पुढे गुन्हेगार जन्म घेतात, अशी त्यांची काम करण्याची एकंदरीत पध्दती होती.

माजलगावातील कायदा व सुव्यवस्था कशी आहे हे लहान मुलांना जरी विचारले तरी ते मॅडमच्या हवाल्याने उत्तम आहे असं सांगू शकतील. चांगले काम करताना अधिकार्‍यांवर अशी संकटे येत असतात. परंतु भारतीय नागरिक म्हणून आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला हवे. कुणाचे तरी हितसंबंध दुखावल्याखातर आपण प्रामाणिक अधिकार्‍यांना आरोपींच्या कटघर्‍यात उभे करतो, असे करणे चुकीचे वाटत आहे. स्थानिकाकडून बोलल्या जाते. परंतु या प्रकरणात त्यांचा धाडसीपणा अनेकांच्या डोळ्यात. खूपत होता. खरं काय अन खोटं काय तपासाअंंती सिध्द होईलच  याा संदर्भातून जो काही कथित व्हिडिओ सोशल मीडियामार्फत व्हायरल केला जात आहे तो प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. त्या व्हिडिओचा गैरवापर थांबवावा. व्हायरल होणार्‍या व्हिडिओमुळे दोन समाजात विनाकारण जातीय तेढ निर्माण करुन एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याला त्याच्या कामापासून परावृत्त करण्याचा प्रकार आहे. दोन्ही समाजातील समंजस नागरिकांनी या व्हिडिओमागची पार्श्वभूमी आधी माहिती करुन घ्यावी, व विनाकारण अशांतता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन बीड येथील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.

सदरील प्रकरण हे  मराठा क्रांती मोर्चा वेळी झालेल्या लाठीचार्ज मध्ये जखमी तरुणाचे कौन्सिलींग करतांनाचा आहे. त्यांनी त्या तरुणाला बोलावून घेतले. त्यासोबतच आंदोलनातील इतरही तरुणांना बोलावून घेतले. आणि त्यांचं काऊन्सिलींग सुरु केलं. त्यावेळी तरुणांनी मॅडमकडे संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. मागासवर्गीय पोलीस कर्मचार्‍याने केलेला लाठीमार जाणीवपूर्वक केला आहे. तुम्हीही मराठा विरोधक आहात म्हणूनच आमच्या एका मराठा आंदोलकाला फोडून काढले आहे, तुमचा जाहीर निषेध वैगेरे बोलत होते. त्यावर नवटके मॅडमनी कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये, मी कुणाचीही गय करणार नाही. तुम्ही तरुण आहात गुन्हे दाखल झाले तर आयुष्य बरबाद होऊ शकतं. त्यामुळे दगड, काठ्या हातात घेऊ नका, जाळपोळ करण्याचा प्रयत्न करु नका. चुकीचे काम करणार्‍यांची मी गय करीत नाही, असा पोलीसी खाक्या दाखविला. काऊंस्लिंग करताना त्या तरुणांच्या बाजुने व्हावी, त्यांनाही विश्वास वाटावा यासाठी मॅडमने खोटे गुन्हे असतील अथवा खोट्या अ‍ॅट्रॉसिटी करणार्‍यांना मी काय शिक्षा करते. अशा प्रकारचे वक्तव्य केले. चुकीचे काम करणारा कोणीही असो, अगदी मुस्लिम, हिंदू, दलित या कोणालाच सोडत नाही, असे त्या सांगत होत्या. ही त्यांची भावना चुकीची कशी असू शकते? त्यांच्या बोलण्या पाठीमागच्या भावना या केवळ कायदा व सुव्यवस्था राखावी अशाच असल्याचे दिसून येते. अशी सर्व सामन्याची मत आहे.

तरी सर्व समाजाच्या सर्व समाज बांधवांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की आपला कुणाही नेत्यांकडून गैरवापर होऊ नये. आपली सदसद विवेक बुध्दी जागृत ठेऊन सामाजात वागावे. आपल्यामुळे अशांतता निर्माण होईल, कुणावर तरी अन्याय होईल, असे वर्तन घडू नये याची काळजी घ्यावी, ही सकल मराठा समाजाच्यावतीने विनंती करण्यात येत आहे. या संदर्भातून लवकरच माजलगावात नेते आणि अधिकारी विरहीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात येईल, असेही सकल मराठा समाजाच्यावतीने कळविण्यात आल्याचे सोशल मिडिया मध्ये कळविण्यात येत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या