पानिपत युद्ध हे हार चे प्रतिक नाही शौर्यचे प्रतिक आहे.

बुराडी घाट दिल्ली येथील लढाईत बचेंगे तो और भी लढेंगे दत्ताजी ने मरतनाही नजीबखान दिलेली  चुनौती पासून खरी पानीपत युध्दाची सुरवात झाली होती तरतिचा शेवट सन 1761 साली पानिपतावर झाला.

पानीपत युद्ध ही मराठ्यांची हार नसून अथक परिश्रम, प्रचंड चिकाटी आणि शौर्याच प्रतिक आहे. मुळातच सह्याद्रीच्या कुशीतील बारा मावळंचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, कायम गनिमी काव्याने लढाया करणारे हे शूर मराठे यांना महाराष्ट्राची माती सोडून मैलो दूर असलेल्या हरियानातील पानिपत येथे मैदानी युद्ध करण्याची गरजच काय पडली?

दिल्लीच्या गादीवर चाल करून आलेल्या अफगाणी अब्दालीच्या संकटाच्यावेळी  स्वतःला शूर म्हणून घेणारे लपून बसले असताना हे राष्ट्रसंकट समजून धर्माने मुसलमान असलेल्या मोगल बादशहाच्या रक्षणासाठी यमुनेच्या तीरावर हा मराठा निधड्या छातीनी उभा होता. युद्धात दाना-गोटा संपल्यावर शेवटी तीन तीन दिवस उपाशी पोटी राहून सैन्य लढले, शत्रूंनी सुद्धा वाहवा करावी असे दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे, समशेरबहाद्दर (थोरले बाजीराव व मस्तानी पुत्र) विश्वासराव पेशवे, संताजी वाघ, इब्राहिमखान गार्दी (मराठा तोफखाना प्रमुख) सदाशिवराव भाऊ व अनेक शूर वीर मराठे या युद्धात लढले व खर्ची पडले. लाख मराठ्यांच्या रक्तानी पानीपत लाल झाले. अहमदशहा अब्दालीने बऱ्याच लढाया लढल्या व जिंकल्याही पण मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहून तोंडात बोटे घातली व अश्या प्रकारची युद्धाची लालसा, खुमखुमी व इतक अफाट शौर्य इतरांकडून होण व दिसण अशक्य आहे.पानीपत युद्ध जरी हरले असले तरी पुन्हा उत्तरेकडून एक ही परकीय आक्रमण झाले नाही, हा मराठ्यांचा वचक.

छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की छाती गर्वाने फुलून यावी व पानिपत म्हटलं की मन दुःखाने हळवं व्हावं तो मराठा. इतिहासाची पाने उलटून पाहिली की लक्षात येत की ज्या ज्या वेळी मराठे संकटात सापडले किंवा संपले अस समजलं त्या त्या वेळी ते तेवढ्यात ताकतीने, स्फूर्तीने व अधिक तीव्रतेने उभे राहिले, लढले व साम्राज्य वाढविले. भारतात असा भूभाग सापडणे कठीण जिथे मराठ्यांचे रक्त सांडले नाही.

दिल्लीच तख्त राखण्यासाठी गेलेल्या माझ्या वीरांचा पानिपत इतिहास जेंव्हा आपण वाचतो तेंव्हा तर अंग गरम होत, कंठ दाटून येतो, डोळे लाल होतात आणि डोळ्यातून आपोआप अश्रुधारा वाहू लागतात एवढं अफाट कर्तव्य मराठयांनी बजावलं.

पानिपतच्या तिसऱ्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या 18 पगड जातींतील ज्ञात-अज्ञात वीर मराठयांना विनम्र अभिवादन, मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रम ला मानाचा मुजरा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या