सामुहिक विवाह मेळाव्यात विवाह करणाऱ्या कुणबी- मराठा दांपत्यांच्या पाल्यांना मोफत संपूर्ण शिक्षण देणार - जि.प. सदस्य राम देवसरकर यांची घोषणा !


        माहूर(ता.प्र.)सामुहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या नांदेड , यवतमाळ सह नजीकच्या जिल्ह्यातील कुणबी –मराठा समाजाच्या दांपत्यांच्या पाल्याचे यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज शिक्षण संस्था यवतमाळ व्दारा संचलित सर्व शाळा महाविद्यालयात मोफत करणार असल्याची घोषणा यवतमाळ जि.प. सदस्य तथा  यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज शिक्षण संस्था यवतमाळचे अध्यक्ष राम देवसरकर यांनी येथे केली,

     माहूर,किनवट,महागाव तालुक्यातील समाजबांधवांच्या  वतीने आयोजित माहूर येथील  उपवर वधू वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते. ग्यानबाजी केशवे महाविद्यालय माहूर येथे दि.२७ रोजी कुणबी मराठा समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आयोजित उपवर वधू-वर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल राज्यमंत्री डी.बी पाटील. जेष्ठ नेते नामदेवराव केशवे, माजी खासदार सुभाष वानखेडे, अॅड शिवाजीराव माने, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, माधवराव पाटील हडसणीकर, विखे  पाटील कृषी परिषदचे प्रदेश उपाध्यक्ष  भागवत देवसरकर  जी.प.सदस्य राम देवसरकर, माहूर न.प. चे उपाध्यक्ष राजकुमार भोपी, जगदीश बिटरगावकर, उदय नरवाडे, अनिल पाटील कऱ्हाळे, वैजनाथ करपुडे पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव भाऊसाहेब नेटके, नगरसेविका सौ.वनिता जोगदंड, सौ.अश्विनी तुपदाळे, सौ.सुप्रिया गावंडे, प्रकाश बुटले, आदी सह ६ हजार कुणबी मराठा समाजबांधवांची उपस्थिती होती. प्रामुख्याने शेती व्यवसायात असलेल्या मराठा समाजास परंपरागत रूढी परंपरेच्या बाहेर काढून कर्जे घेऊन लग्नाचा खर्च करण्याचा बडेजाव करून समाज कर्जबाजारी होऊ नये म्हणून प्रोत्साहित होऊन जास्तीत जास्त नवदांपत्यांनी सामुहिक विवाह मेळाव्यात विवाह करावेत म्हणून  राम देवसरकरांनी सामाजिक बांधिलकी बाळगत मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलल्याने त्यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या