माहूर येथील कुणबी-मराठा समाज वधूवर परिचय मेळाव्यात १ हजार १६ उपवर- वधू वरांनी सादर केले परिचय ! एक विवाह सोहळाही संपन्न,

कुणबी-मराठा समाजाची प्रगतीपथाकडे वाटचाल
माहूर(ता.प्र.)प्रामुख्याने शेती व्यवसाय करणाऱ्या कुणबी-मराठा सामाजातील माहूर,किनवट महागाव तालुक्याच्या मराठा युवा मंचच्या वतीने राज्यस्तरीय उपवर वधू परिचय मेळाव्यात आज दि.२७ रोजी माहूर येथे १ हजार १६ उपवर वधू- वरांनी परिचय दिला असून याच सोहळ्यात एक विवाह सोहळा सुद्धा संपन्न झाला असून मेळाव्याचा उद्देश सफल होऊन कुणबी-मराठा समाज आधुनिकतेची कास धरून प्रगतीपथावर वाटचाल होण्यास हा सोहळा मैलाचा दगड ठरणार आहे.



           माहूर या शक्तीपिठावर ग्यानबाजी केशवे महाविद्यालयाच्या प्रांगणात दि २७ रोज रविवारी  आयोजित उपवर वधू-वर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल राज्यमंत्री डी.बी पाटील. जेष्ठ नेते नामदेवराव केशवे, माजी खासदार सुभाष वानखेडे, अॅड शिवाजीराव माने, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, माधवराव पाटील हडसणीकर, विखे  पाटील कृषी परिषद भगवत देवसरकर  जी.प.सदस्य राम देवसरकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रवक्ते भाऊसाहेब नेटके,जगदीश बिटरगावकर, उदय नरवाडे, अनिल पाटील कऱ्हाळे, वैजनाथ करपुडे पाटील, नगरसेविका सौ.वनिता जोगदंड, सौ.अश्विनी तुपदाळे, सौ.सुप्रिया गावंडे, प्रकाश बुटले, आदीसह कुणबी मराठा समाजातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्तविक डॉ.राम कदम यांनी केले.


       या परिचय मेळाव्यात समाजातील ३६४ उपवर वधू  ६५२ वरांनी आपल्या परिचयाचे सादरीकरण केले. तर भोसा ता.महागाव जि. यवतमाळ येथील वर राजू पांडुरंग चव्हाण व पोहंडूळ ता.महागाव येथील  वधू  अश्विनी पंजाबराव नरवाडे पारडकर यांचा विवाह सोहळा सुद्धा संपन्न झाला. या मेळाव्यात विवाह करणाऱ्या नव दांपत्यांना समाज,  आयोजक आणि मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या संयुक्त विद्यमाने  रोख स्वरूपात मोठ्या रक्कमेचे आशीर्वादपर आंदन देण्यात आले. या उपवर वधू, वर मेळाव्याची पुस्तिका छापण्यात आली व याच सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तर कुणबी मराठा समाजाच्या विवाह मेळाव्यात विवाह करणाऱ्या दाम्पत्यांच्या पाल्याचे  शिक्षण यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज शिक्षण संस्था यवतमाळ च्या विविध विद्यालयात  मोफत करण्यात येईल अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष जि.प. सदस्य राम देवसरकर  यांनी केली.  सोहळ्यास माहूर, किनवट महागाव सह राज्यभरातून १ हजार १६ उपवर वधू- वरा सह ५ ते ६ हजार समाजबांधवांनी हजेरी लावली.


 याप्रसंगी अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या तर्फे उपस्थित सर्व समाजबांधवासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विलास पाटील चौधरी यांनी व त्यांच्या चमूने भोजनाची व्यवस्था उत्कृष्टपणे सांभाळली. आयोजकिय मनोगत त्रिशूल पाटील यांनी व्यक्त केले. या प्रसंगी डी.बी पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून मराठा समाजाने कोणत्याही प्रकारे बडेजाव न करता मेळाव्यांची कास धरून सामुहिक विवाह सोहळे व वधू वर परिचय मेळाव्यात सहभाग घेऊन आधुनिकतेची कास धरावी असे सांगितले. आभार प्रदर्शन कामाजी पवार यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी माधवराव पाटील हडसनीकर, बाबाराव केशवे, राजकुमार भोपी, डॉ.बाबाराव डाखोरे, देवकुमार पाटील, भाऊराव पाटील, माणिकराव पाटील, शंकर ठाकरे, विनीत पाटील   शिवशंकर थोटे, सुनील जाधव, जयकांत मोरे, संतोष पाटील, अविनाश नरवाडे, अमोल केशवे ज्ञानेश्वर चौधरी, रवी जगताप, प्रा.नितीन रिठे, सुरेश कोथळकर, भरत ठाकरे, दिगांबर जगताप, गणेश जाधव, जयकुमार अडकीने, प्रा.प्रवीण बिरादार, प्राजक्ता नागपुरे, रिठे मॅडम, आदीसह माहूर,  किनवट,महागाव तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या