मिरवणुकीस भव्य प्रतिसाद
मराठा सेवा संघ व ३२ कक्ष आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा नवा मोंढा नांदेड येथे आपल्या अध्यक्षीय भाषणात खा. अशोकरावजी चव्हाण बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, जगभरात शिवजन्मोत्सव दिवाळीप्रमाणे साजरा होत आहे. आपण सर्वजण उत्कृष्ट कार्य करत आहात या शब्दात मराठा सेवा संघाचे त्यांनी अभिनंदन केले. मराठा आरक्षणाबद्धल बोलताना मराठा आरक्षण मिळेपर्यंत खर आहे का ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उभा केला.
मराठा सेवा संघ व ३२ कक्षाच्या वतीने सार्वजनिक शिवजन्मोत्सव गेल्या कित्येक वर्षांपासून अखंडपणे नवा मोंढा येथे भव्य स्वरुपात होत असतो. त्याचप्रमाणे याहीवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा हा रक्तदान शिबिर, शिवविवाह सोहळा, मान्यवरांची व्याख्याने अशा विविध कार्यक्रमासह अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण तर उद्घाटक म्हणून लोहा -कंधार चे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, तसेच आ. डी पी सावंत, आ. राम पाटील रातोळीकर, आ. अमर राजूरकर, संभाजी ब्रिगेड प्रवक्ते गंगाधर बनबरे, शांताबाई जवळगावकर काकू, किशोर भवरे, नागोलिकर मामा, विनय गिरडे, मिलिंद देशमुख, प्रशांत तिडके, माधव पावडे, पप्पु कोंढेकर, किशोर स्वामी, विठ्ठल पावडे, आनंद चव्हाण, बी. आर. कदम, शर्मिष्ठा जाधव यांच्या सह प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक मा. आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. आ. डी. पी. सावंत म्हणाले की सर्जिकल स्ट्राईक हि शिवरायांनी त्या काळात दाखवून दिली. आज शिवनीतीची गरज आहे. आ. राम पाटील रातोळीकर आपल्या भाषणात छत्रपती शिवरायांची कर्तृत्व सांगताना म्हणाले की शिवराय हे सर्वसमावेशक राजे होते.
यावेळी शिवधर्म पद्धतीने कोमल कदम व श्याम चापके गाव परभणी या आणि शिवकांता जाधव व मारोती आडकीणे गाव इजंनगाव पूर्व या दोन दाम्पत्यांचा शिवविवाह हर्षोल्हासात लावण्यात आला. दि. १८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते डॉ. वर्षा कदम यांना डॉ. रख्माबाई सावे पुरस्कार, शारदा पाटील यांना रणरागीणि पुरस्कार तसेच मारोतराव कवळे यांना मराठा भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर भव्य मिरवणूकीस सुरुवात झाली या मिरवणुकीत विविध देखावे, लेझीम पथक, लाठीकाठी पथक, तलवारबाजी पथक, शिवकालीन देखावे, छ. शिवाजी महाराज जन्म पाळणा गिताद्वारे देखावा, महिला व पुरुष ढोल पथक, भजनी मंडळ आदिंचा समावेश होता. सदर शिवजन्मोत्सव सोहळ्यास लाखोंचा जनसमुदाय जमला होता.
शिवजन्मोत्सव यशस्वितेसाठी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तथा शिवजन्मोत्सव २०१९चे अध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, शिवजन्मोत्सव स्वागताध्यक्ष तथा मराठा सेवा संघ तेलंगणा राज्य प्रभारी प्रा डॉ गणेश शिंदे, मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ पंजाब चव्हाण,जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष डॉ रेखा पाटील, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक इंजि शे.रा.पाटील,संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील ,मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर,डाॅ सोपानराव क्षीरसागर, रमेश पवार, सतीश जाधव, जिजाऊ ब्रिगेड उत्तर जिल्हाध्यक्षा डॉ विद्या पाटील, जिजाऊ ब्रिगेड दक्षिण जिल्हाध्यक्षा मिनाक्षी हिंगोले, संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शाम पाटील, संभाजी ब्रिगेड नांदेड मध्य जिल्हाध्यक्ष भगवान कदम, व्ही बी व्ही पी चे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे ,सुभाष कोल्हे यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व ईतर
पक्षाचे पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते आदींनी अथक परिश्रम घेतले होते.
0 टिप्पण्या