माहुर ----जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात शासनाच्या निर्देशानूसार शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलल्या पारदर्शीपणे करण्यात येतील अशी ग्वाही जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी शिक्षक संघटना
पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकित केली. यावर्षी शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या ३१जुलै पर्यंत करावयाच्या असल्याने याबाबत जिल्ह्यातील शिक्षक संघटना पदाधिकारी यांची विशेष बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली.यावेळी शिक्षण समिती सभापती संजय बेळगे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी सुधीर ठोंबरे,शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर,उप शिक्षणाधिकारी के.टी.आमदुरकर, डी.एस.मठपती , बळीराम येरपूलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी बैठकीच्या आयोजनाची भूमिका विषद करत होऊ घातलेल्या बदल्या आणि शासन निर्णयाधीन बाबींवर प्रकाश टाकला.शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी ही मार्गदर्शन केले.उपस्थित शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. म.पुरोगामी प्रा.शि.संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष जी.एस.मंगनाळे यांनी बदल्यासंदर्भात मत मांडले तसेच उपस्थित विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी यांनी आपापल्या संघटनेची भूमिका मांडली.महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने बदल्यासंदर्भातचे निवेदन राज्यकोषाध्यक्ष बालाजी पांडागळे ,जिल्हाध्यक्ष जी.एस.मंगनाळे ,विभागिय उपाध्यक्ष बाबुराव माडगे यांनी दिले.यावेळी अनेक इतर संघटना पदाधिकारी उपस्थित होते.अशी माहिती जिल्हाप्रसिध्दीप्रमुख तथा माहुर तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील ,जिल्हासंघटक सुरेश मोकले यांनी दिली.
0 टिप्पण्या