-----------------------------------
नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजातील आदर्श, संयमी,काम,त्याग,चांगल्या निष्ठा जोपासणारे नेत्रत्व ,मराठा सेवा संघाचे माजी जिल्हा अध्यक्ष,चळवळीचे मार्गदर्शक शिवश्री इंजि.श.रा.पाटील एकोण चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर पाटबंधारे विभागातून उपविभागीय अभियंता या पदावरून आज 31 आँगष्ट 2020 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
पोलीस निरीक्षकाचा मुलगा असणाऱ्या शेषेरावास वडिलाच प्रेम दीर्घ काळ लाभल नाही.दोन भाऊ,आई घर सांभाळत जळगाव या खानदेशातून नांदेड जिल्ह्याच्या कर्मभूमीत कायमचे रमले नाही तर इथलेच झाले.हिंगोली,परभणी,नांदेड जिल्ह्यातच सारी सेवा त्यांनी बजावली आहे.शेषराव पाटील हा शे.रा.पाटील नावानच ओळखला जातो.वाघा सारखा माणुस घरात घरच्यासाठी,कार्यालयात कार्यालयासाठी,समाजात समाजासाठी स्वत:च कोणतेही दु:ख दिसू न देता,हसत-खेळत सतत काम करत राहतात.स्वत:चे दोन्ही मुल पायावर उभी राहीली आहेत.समजातील मुल स्वत:च्या पायावर उभी राहीवित म्हणून सतत धडपडणारा हा एक कर्मयोगीच आहे.त्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या असंख्य मुलाची नावे घेता येतील .चळवळीतील तरूनाना मदतीचा हात देवून उभे करून खुप मोठे बनविलेत.हे मी पंचविस वर्षापासू पाहतो आहे.
साधी राहणी ,उच्च विचार सरणीचा परिवर्तन चळवळीत राहूनही भजन कार्यात रममान होणारा पाटील साऱ्याना आवडणारा आहे.साऱ्या जाती - धर्माचे मित्र आहेत.मित्र कसे जोपासावेत ,टिकवून टेवावेत,संयम,त्याग,समर्पन,संघर्ष,सेवाभाव हा श.रा.पाटलाकडून शिकण्यासारखा आहे.पायावर नतमस्तक व्हाव,अस हे व्यक्तिमत्व आहे.
युगनायक इंजि.अँड.पुरुषोत्तम खेडेकर याच्या परिसस्पर्शामुळे शे.रा.पाटलांच जिवनात जगण्याच सामर्थ्य निर्माण झाले.चारित्र्य संपन्न,निस्वार्थपणामुळे मधुकर मामा देशमुख व चंद्रभान पाटील जवळेकर ,कामाजी पवार,शिवाजीराव खुडे,डाँ.सोपान क्षीरसागर,नानाराव कल्याणकर,शामसुदंर शिंदे यांच्या साथीने माझी प्रशासकीय सेवा समाप्ती पर्यंत पाहिलेल "मराठा मुलीच्या वसतीग्रहाचे" स्वप्न नवा मोंढा,नांदेड येथे समाजाच्या सहकार्यातून साकार झाले.
प्रशासकीय सेवा समाप्ती नंतर आता समाज कार्यासाठी सर्वाचे आवडते ,मार्गदर्शक असणाऱ्या इंजि.श.रा.पाटील यास आयुरारोग्य लाभो,ही सदिच्छा..!
-- पंडित पवळे
माजी सचिव मराठा सेवा संघ नांदेड
तथा
राज्यपुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक ...
0 टिप्पण्या