लॉकडाऊन बाबत मा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे स्पष्टीकरण. कृपया अफवा पसरवू नये.


 नांदेड।

     वाढत्या कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यास्तरावर निर्णय घेऊन स्वतःच्या अधिकार क्षेत्रात कोविड नियंत्रणा संदर्भात काही उपाययोजना करता याव्यात तथा वाढता कोविड पार्दुभाव नियंत्रणात यावा यासाठी नांदेड जिल्ह्यातंर्गत 4 तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित केले होते.

सदरील लॉकडाऊन वाढवून पुढे 15 तारखेपर्यंत  केले असा गैरसमज नांदेड जिल्ह्यात  होताना दिसत आहे. याबाबत जिल्हाधिकारी  विपिन इटनकर यांनी स्वतः एका व्हिडिओ प्रसारित करुन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ज्या सुचनाचे पत्रक निर्गमित केलेले आहेत ते राज्यस्तरावर महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या गाईडलाईन्स बाबत आहेत. रात्री आठ वाजेनंतर  नाईट कर्फ्यु लावणे.कोणत्या आस्थापना कधी पर्यंत चालू ठेवणे याबाबत दिशा निर्देश आहेत. त्यामुळे कुणीही अफवा पसरू नयेत. 4 तारखे नंतर आपल्याला महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या सुचना पाळण्याबाबत दिशा निर्देश आहेत. असे अवाहन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या