कोण आहेत मराठा आरक्षण विरोधात याचिका करणाऱ्या जयश्री पाटील ?



 मराठा आरक्षणा विरोधात याचिका दाखल करणाऱ्या जयश्री पाटील व गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यवर करण्यात आलेले शंभर कोटी वसूल करुन द्या या आरोपांची आता  सीबीआय चौकशी होत असल्यानं त्यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हायकोर्टानं ज्या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआय चौकशीचे आदेश दिले ती याचिका अ‍ॅड जयश्री पाटील - सदावर्ते यांनी दाखल केली होती. या आधीही त्यांनी मराठा आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. सध्या मराठा आरक्षणाची केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे. मराठाना देण्यात आलेले आरक्षण हे संविधान विरोधी असंविधानीक आहेत म्हणून ते कोर्टात गेले असे म्हणने असते.  आता आपण  जाणून घेणार आहोत की, जय़श्री पाटील नेमक्या आहेत तरी कोण.

जयश्री पाटील या मराठा आरक्षणाविरोधात 2018 साली दाखल केलेल्या याचिकाकर्त्यां आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय माहुर ता. माहुर जि. नांदेड येथील स्वतंत्र सैनिक डॉ. लक्ष्मणराव किसनराव पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण बालपण हे माहुर येथेच झाले आहे. स्वतंत्र सैनिक एल के पाटील हे बौद्ध समाजातील असल्याने बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ साहित्य घरातच उपलब्ध झाल्याने त्यांना कायदा विषयात आवड निर्माण झाली. पुढे त्यांचे वकीलीचे शिक्षण औरंगाबाद येथे पुर्ण झाले. त्यांचा मंगल परिणय नांदेड येथील अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याशी झाला. मुंबईत त्यांनी एल एल एम चे शिक्षण घेतले. तसेच क्रिमिनीलॉजी या विषयात त्यांनी पिएचडी केली आहे. त्यांना अपत्य एक झेन सदावर्ते नावाची मुलगी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या