कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक असा आहे 3 लशींमध्ये फरक

नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल (Niti Aayog member) यांनी काल गुरुवारी केंद्र सरकारच्या लशीकरणासंदर्भातील योजनेची रुपरेषा सांगितली आहे. त्यांनी म्हटलंय की, सरकार एकूण आठ लशींद्वारे भारतातील सर्व नागरिकांचे 2021 वर्षाच्या अखेरपर्यंत लसीकरण (COVID-19 vaccines) करण्याच्या नियोजनात आहे. बायोलॉजिकल ई, झायडस कॅडिला, नोवाव्हॅक्ससाठी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडिया, नेझल व्हॅक्सिनसाठी भारत बायोटेक आणि स्पुटनिक व्ही या लशींच्या आपत्कालीन वापरसाठी मान्यता तसेच लस उत्पादनात वाढ करण्यावर जोर दिला आहे. मात्र, सध्यातरी येत्या आठवड्यापासून भारताकडे लशीसाठी तीन पर्याय उपलब्ध असणार आहेत. यामध्ये रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही, ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाची लस कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस समाविष्ट आहे. रशियाची ही लस एडीनेव्हायरस व्हेक्टरवर आधारित असल्याचं सांगण्यात आलंय तसेच ही लस जगातल्या 59 देशांमध्ये मंजूर करण्यात आली आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या