शिवधर्माचा खरा प्रचारक हरवला

प्रा.डाँ.गणेश शिंदे यांच्या अचानक जाण्याने नांदेड जिल्ह्याच्या मराठा सेवा संघाचा आधारवड कोसळला भावना असंख्य जणांनी व्यक्त केल्या आहेत .27 मे 2021 गुरूवार दुपारी  हर्ट अँट्याकने मराठा बहुजन चळवळीची खूप मोठी हानी झाली .अर्धापूर तालुक्यातील शेनी(पारडी) येथे 01 जुलै 1964 रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेले गणेशरावानी नांदेड येथील पिपल्स काँलेज मधून मराठी विषयात पदव्युत्तर पदवी,डाँक्टरेट होऊन हदगाव येथील श्री दत्त कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक व तदनंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे  संचालक विद्यार्थी कल्याण विभाग अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळून विद्यार्थीप्रिय बनले होते.


राज्यभर विद्यापीठाच्या दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमामुळे ते लोकप्रिय झाले.साडेसहा फुट उंची,गोरेपान,रुबाबदार साजेसे भारदस्त सुटाबुटातल  व्यक्तीमत्वाचे मनाला भुरळ घालणारे होते.सुंदर अभ्यासपुर्ण भाषण शैली होती .मुळातला बंडखोर स्वभाव,अन्यायाचि चिड,गरीबा विषयी कणव होती . होता .जिजाऊ ,शिव,शाहू,फुले,आंबेडकर ,अण्णाभाऊ सह बहूजन महापुरूषाचा विचार अंगिकारलेला .नरेंद्र दाभोळकर यांच्या विचाराने प्रथम प्रभावित होऊन अंधश्रध्दा निर्मुलनाचे काम झपाटून केले.नंतर युगनायक पुरुषोत्तम खेडेकर यांची भेट व त्यांच्या विचाराने मराठा सेवा संघाकडे वळले.तालुका अध्यक्ष ,मी पंडित पवळे जिल्हा सचिव असताना जिल्हा अध्यक्ष ,विभागीय अध्यक्ष ,केंद्रिय कार्यकारीणीचे सदस्य आणि सद्या तेलंगणा राज्याचे प्रभारी म्हणून मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत सक्रीय होते .

दरवर्षी जिल्ह्यातील गुणवंताना प्रोत्साहन ,19 फेब्रुवारी सार्वजनिक शिवजन्मोत्सव,बहूजन चळवळीतील महापुषाची जयंती पुण्यतिथी सक्रीय सहभाग घेत.प्रभावी मार्गदर्शन करत.प्रत्येक मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होतो.राणे कमिटी समोर आम्ही महत्त्वाची भुमिका वटवली.मराठा सेवा संघातील तेहतीस कक्षातील अंदोलकाना सर्वोतोपरी मदत राहायची .नांदेड सिडको जिजाऊ सृष्टीवर महानगर पालीकेनी अततायीपणा केल्यावर सर विद्यापीठात कामात असतानाही माहा फोन गेल्यावर लगेचच धाऊन आले.मेहुणे बाजार समितीचे सभापती असल्याने शहरातील मुलीच्या वसतीगृहसाठी जागा मिळवून घेण्यात त्यांची महत्वाची भुमिका होती .

विचारातून असंख्य विद्यार्थी घडविले.स्वतःच्या पायावर उभे केले.राजमुद्रा न्युज लाईव्हचँलनचे सहसंपादक,जमाते ईस्लाम,बाँमसेफ ,सह विविध राजकीय ,सामाजिक ,सांस्कृतिक चळवळीशी चांगले संबंध होते .या कामी दोन्ही चिरजिवासहीत सहचारीणी हेमलत्ताचे ही मोठा वाटा होता.

प्रा.डाँ.गणेश शिंदे उत्कृष्ट नियमित योगा करत.कपालभारती,आनुलोम विलोम,व्यायाम व दररोज किमान तीन किलो मिटर चालण्याचा सराव असतानाही काळाने असा घाला घातला.

प्रा.डाँ.गणेश शिंदे सरानी तीन ग्रंथाचे लेखन केले आहे .त्यात "बहुजनांची मानसिकता आणि शिवधर्म" हा त्यांचा ग्रंथ प्रचंड गाजला.तसा वादग्रस्त ही ठरला.जानेवारी 2010 रोजी बळीवंश प्रकाशन ,नांदेड यांनी प्रकाशीत केला.त्याला युगनायक पुरुषोत्तम खेडेकर यांनी पाठराखन केली आहे .त्यांनी दोन-तीन चित्रपटातही काम केले आहे . सकारात्मक ऊर्जा होती .आनंदी चेहरा विनोदी स्वभाव माणसं जोडणारा होता.19 मार्च 2021  रोजी कोरोना पाँझिटीव्ह निघाले होते .साटी स्कोअर 4 होता.गृहविलगीकरणात राहूनच कुटलाही त्रास न होता बरे झाले.6 मे कोविडची पहिली लस घेतली होती .या लाँकडाँऊनच्या काळात शेतीशी जास्त लळा लावला होता.त्यांचे अनेक मित्र ह्या काळात गेल्यामुळे थोडे हळवे बनले होते .परवा मराठा आरक्षण संदर्भात छ.संभाजीराजे यांच्या समोर अत्यंत प्रखड मराठा समाजाची व्यथा व दशा मांडली .छत्रपतीने त्यांना सर्वांगानी न्याहळले.दुसऱ्या रात्रीस छत्रपतीस मराठा आरक्षणासंदर्भात रोखठोठ पत्र लिहून सोशल मिडियावर टाकले .मेहुण्याचे नाते सोडून पाटच्या भावाचे प्रेम देणारा अशोकराव टेकाळे सह मराठा सेवा संघ व कुटुंबाला दुःखात लोटून असे विस्वास न बसणारे निघून जाणे.ह्यामुळे बहूजन चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे .

सरानां भावपुर्ण शिवाजंली ..!  कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे बळ देवो...ही जिजाऊ चरणी प्रार्थना ...! 

  पंडित पवळे ,माजी जिल्हा सचिव ,मराठा सेवा संघ,नांदेड  मो.9890232962

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या