हवामान विभागाने यंदा 1 जून रोजी केरळात मान्सुनचा पाऊस येईल असा अंदाज दिला होता. मात्र तीन दिवस हा पाऊस लांबला. अंदामान बेटांवर २१ मे रोजी मान्सुन आल्यानंतर २७ जूनला, श्रीलंका, मालदीव च्या समुद्री भागात हा पाऊस आला.
हे ही वाचा ः
- Cotton कापुस लागवडीबाबत कृषी विद्यापीठाने दिलाय सल्ला.-वाचा सविस्तर
- Sarathi संस्थेच्या इमारतीसाठी जमीन आणि अधिकारी-कर्मचारी उपलब्धचा संचालक मंडळाची बैठकीत निर्णय
- Cancel HSC Exam राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीची परीक्षा रद्द- काय झाला निर्णय वाचा
- Kenya Help Healthcare अमेरिकेला 14 गायींच दान करणारा संवेदनशील केनियाची भारताला मदत.
- Promotion Reservation : पदोन्नती आरक्षणावरुन महाविकास आघडीत बिघाडी, त्याबाबतचा कायदा काय सांगतो ?, वाचा सविस्तर..
आता आजपर्यत आरबी समुद्राचा दक्षीण भाग, बंगालच्या उपसागरातील बहूतांश भागात मान्सुनचा पाऊस पोचला आहे. महाराष्ट्रातही हा पाऊस लकरच येणार असून त्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. दरम्याण राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चागंला पाऊस
डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात खंड पडेल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. विदर्भातील विविध भागात म्हणजे पश्चिम विदर्भात 98 टक्के, मध्य विदर्भात 102 टक्के, पूर्व विदर्भात 100 टक्के, मराठवाडा 98 टक्के, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात 98 टक्के, पश्चिम महाराष्ट्रात 99 टक्के मान्सन बरसेल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होत.
0 टिप्पण्या