EWS reservation is currently option For Marathas | EWS आरक्षण एक शाश्वत पर्याय.

माथाडी कामगारांचे नेते आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी स्वतःची आहुती दिली. गरीब, माथाडी, डबेवाले,शेतकरी, कष्टकरी अशा मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आंदोलन उभे केले. आर्थिक निकषावर मराठा आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार दशकांमध्ये वेगवेगळ्या संघटनांनी व नेत्यांनी मोठी आंदोलने केलेली आहेत. 2019 च्या कायद्यानुसार व 103 व्या घटनादुरुस्तीने 10% EWS आरक्षण मराठ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. EWS आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या मागास अशा घटकांना लागू होते. परंतु जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत असे एससी, एसटी, ओबीसी असे जवळपास भारतातील 74 टक्के नागरिक यातून वगळले गेले आहेत. म्हणजे उर्वरित 26 टक्के EWS मध्ये मोडतात.

आता यातील अल्पसंख्यांक समाज अर्थात पारसी, जैन, ख्रिश्चन,मुस्लिम, शीख व इतर धर्म हे जवळपास 13 टक्के आहेत. हे समाज मोठ्याप्रमाणात कधीही शिक्षण व नोकरीमध्ये मराठ्यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले नाहीत. महाराष्ट्रामध्ये EWS मध्ये उरलेल्या जाती म्हणजे ब्राह्मण,कायस्थ, सारस्वत, इतर सवर्ण समाज व मराठे. ब्राह्मण,कायस्थ,सारस्वत व इतर सवर्ण हे परदेशी शिक्षण व नोकरी किंवा खाजगी कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ अधिकारी अथवा सीएअ, सीएस व इतर प्रकारच्या व्यवसायांमध्ये गुंतलेले आपल्याला दिसून येतात. या समाजांची मराठ्यांसोबत शिक्षणामध्ये अथवा नोकरीमध्ये स्पर्धा असली तरी विध्यार्थ्याने खचुन न जाता कठोर परिश्रम करुन आपली प्रगती साधावी.

 EWS  10 टक्के मध्ये या स्पर्धेच्या काळात कठोर परिश्रम केल्यास मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती जागा मिळवू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये व विशेषतः नोकरीमध्ये EWS आरक्षणाचा फायदा हा घ्यायला हवा. या EWS कायद्याला सध्याची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती व घटनादुरुस्तीचे कवच प्राप्त आहे. त्यामुळे समाज आपली लढाई लढत आहे. परंतु आजघडीला आभ्यास करणारे तरुण यांनी खचुन न जाता. सध्या EWS आरक्षण हा एक शाश्वत पर्याय उपलब्ध आहे ! विद्यार्थी व पालकांनी वरील सर्व वास्तवाचा विचार करुन सध्या EWS आरक्षणाचा मार्ग स्वीकारून  स्वतःची व मराठा समाजाची प्रगती करून घ्यावी..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या