वाचा- विचार करा-सहभागी व्हा! ओबीसी खरे शत्रू कोण? छलकपटाने कोण लुटत आहे? नेतृत्वला कोण संपवते ? OBC communities cancelled political reservation in local bodies in Maharashtra
ओबीसिंचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले OBC political Reservation cancelled आपण लढा मिळून जिंकूया! राजकीय आरक्षण रद्द होण्याचा फटका ओबीसी, एनटी, व्हीजे या समूहांना बसणार आहे. आपण सर्व नामाप्र मध्ये समाविष्ट आहोत हे लक्षात येऊ द्या.
73 व 74 वी घटना दुरुस्ती माजी पंतप्रधान राजीव गांधी व नरसिंहराव यांच्या प्रयत्नातून झाली होती.
महाराष्ट्रामध्ये 27 महानगरपालिका, 34 जिल्हा परिषदा, 364 पंचायत समित्या, नगर पालिका आणि 28 हजार ग्रामपंचायती आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून जाणाऱ्या 56 हजार ओबीसी प्रतिनिधींना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला आहे. OBC political Reservation cancelled देशात ही संख्या 9 लाख एव्हढी आहे.
भटके, विमुक्त व ईतर मागासवर्गीय यांचा राजसत्तेतील सहभाग या निर्णयाने थांबणार आहे. हा आवाज कायमचा बंद करण्याचे षडयंत्र उधळून लावण्यासाठी आपण मिळून लढा उभारणे महत्वाचे ठरते.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींची जनगणना, मागासलेपण व प्रतिनिधित्व यांची माहिती मागितली. जोपर्यंत ही माहिती सरकारतर्फे सादर केली जाणार नाही तोपर्यंत न्यायालय पुढील निर्णय देणार नाही.
2010 मधे, शरद पवार व छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनात खासदार समीर भुजबळ यांनी लोकसभेत ओबीसींच्या जनगनणेचा ठराव मांडून आवाज उठविला होता. गोपीनाथ मुंढे सह अनेक खासदारांचे त्यास समर्थन मिळाले. OBC communities may lose political reservation in local bodies in Maharashtra याबाबत तातडीने बैठक घेऊन तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांनी, सामाजिक - आर्थिक - जात जनगणना 2011 सुरू केली. पुढील 3 वर्षात इंपिरिकल डाटा गोळा केला. पुढे 2014 ला केंद्रात मोदी सरकार स्थापित झाले, महाराष्ट्रात फडणवीस सरकार आले. मात्र मागील 7 वर्षांपासून हा डाटा ना केंद्र सरकारने न्यायालयापुढे सादर केला ना फडणवीस सरकारने 5 वर्ष केंद्राकडे मागणी केली. त्यावेळी राज्यसरकाराला देखील ही माहिती जमविण्याची संधी होती ती पण घेतली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली कारकीर्द संपायला 2-3 महिने असतांना केंद्राला डाटा पुरविण्या संदर्भातील पत्र दिले. पण माहिती अद्याप मिळाली नाही.
2020 मध्ये माहाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सत्तेत आले आणि कोरोनाची महामारी आली. यामुळे सगळ्या कामांना खीळ बसला. त्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून 2011 साली गोळा केलेली ओबीसींची माहिती मिळावी म्हणून विनंती केली. OBC communities cancelled political reservation in local bodies in Maharashtra
फडणवीस सरकार प्रमाणेच ठाकरे सरकारला देखील केंद्राकडून इंपीरिकल डाटा प्राप्त झाला नाही.
ओबीसींची अपेक्षा आहे
देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, बावानकुळे यांनी रस्त्यावर उतरण्याआधी ओबीसी - व्हीजे - एनटी आरक्षण कायमस्वरूपी अबाधित राहावे म्हणून संघनितीत बदल करण्याची विनंती करावी व केंद्राकडे आपले वजन वापरून सामाजिक-आर्थिक जनगणना 2011 ची (जी राष्ट्रीय संपत्ती आहे.) माहिती मिळविण्याची धडपड करावी.
महाराष्ट्र सरकारने देखील केंद्र सरकार कडून डाटा मिळण्यास दिरंगाई होत असेल तर, वाट न बघता व वेळ न घालविता राज्य पातळीवर ईतर मागासवर्गीयांचा डाटा जमवून न्यायालयापुढे सादर करावा. यापुढे ओबीसी समाजाच्या जागृतीला खूप महत्व असेल. ओबीसी जनगणने विषयी अट्टाहासी नसणे नुकसानकारक सिद्ध होईल. भविष्यात शैक्षणिक आरक्षणाचाही सत्यानाश होईल.
पदोन्नतीतील आरक्षण थांबविले आहे, शैक्षणिक शिष्यवृत्ती मध्येही अडचणी निर्माण व्हायला लागल्यात, पूर्वी स्पर्धा परीक्षेत ओबीसी, एससी, एसटी मधील उच्चगुणवत्ता प्राप्त विद्यार्थी खुल्या प्रवर्गात अंतर्भूत केल्या जायचे, यावरही आता निर्बंध घातलेत. मुलामुलींची वसतिगृहे नाहीत, आर्थिक विकास महामंडळे ऑक्सिजनवर आलीत.
रोहिणी आयोगाला समोर करून ओबीसींचे चार तुकडे करण्याचे कारस्थान केंद्राकडून सुरू झाले. हळू- हळू ओबीसी समूह संपविण्याचा मांडलेला डाव आपण संघटितपणे उधळून लावू शकतो. प्रत्येकाने आपल्यातील झोपलेल्या सिंहांला जागवणे गरजेचे झाले.
निवडणूक आयोगाने 5 जिल्ह्यातील निवडणुका घोषित करून ओबीसीमुक्त निवडणुकांना सुरुवात केली आहे.
भविष्यात आपणास आपल्या पिढयांनी नाकर्ते म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये म्हणून सर्वांनी या जनआंदोलनात सहभागी व्हावे. प्रत्येकांनी केंद्र व राज्य सरकार यांना आरक्षण पूर्ववत ठेवण्या संदर्भाने व ओबीसींची जनगणना करण्यासाठी ईमेल करावे, पत्रे पाठवावी, सह्यांची निवेदने तालुका-जिल्हा स्तरावर स्वयंस्फूर्तीने द्यावीत. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषदा, महानगर पालिका, पंचायत समित्या, जिल्हापरिषदा येथील नामाप्र प्रतिनिधिंनी ठराव करून पाठवावेत. आमदार, खासदार यांना ठिकठिकाणी भेटून ओबीसींच्या लढ्यात पुढाकार घेण्यास व न्याय मिळवून देण्यास बाध्य करावे.
अनेकांकडे आणखी काही नवीन कल्पना असतील त्या पद्धतीने सहभाग नोंदवावा. मात्र स्वस्थ बसू नये.
देशाच्या लोकसंख्येत 52% टक्के असलेल्या ओबीसी समूहाने पक्ष आणि संघटनांच्या बंधनात अडकुन पडू नये. भारतीय राजकारणात आपले उपद्रवमूल्य सिद्ध केल्या शिवाय राज्यकर्त्यांना आपले मूल्य (मोल) समजणार कसे? OBC communities cancelled political reservation in local bodies in Maharashtra
हरीश कुडे, जवळा, ता.आर्णी, जी.यवतमाळMobile -9850301134, 8830254240
Read-Think-Participate! Who is the real enemy of OBC? Who is robbing by deception? Who ends leadership? OBC communities may lose political reservation in local bodies in Maharashtra
Supreme Court cancels OBC political reservation OBC political reservation canceled Let's win the fight together! The cancellation of political reservation will hit OBCs, NTs and VJs. Notice that we are all included in Namapra.
The 73rd and 74th Amendments were made through the efforts of former Prime Ministers Rajiv Gandhi and Narasimha Rao.
Maharashtra has 27 Municipal Corporations, 34 Zilla Parishads, 364 Panchayat Samitis, Municipalities and 28,000 Gram Panchayats. The Supreme Court's decision has hit 56,000 OBC representatives elected from these local bodies. This number is 9 lakh in OBC political reservation canceled country.
This decision will stop the participation of vagrants, destitute and other backward classes in the monarchy. It is important that we fight together to thwart the conspiracy to silence this voice forever.
The Supreme Court sought information on the census, backwardness and representation of OBCs. The court will not make a further decision until this information is submitted by the government.
In 2010, under the guidance of Sharad Pawar and Chhagan Bhujbal, MP Sameer Bhujbal had raised the issue of census of OBCs in the Lok Sabha. It was supported by many MPs including Gopinath Mundhe. The then Prime Minister Manmohan Singh convened an emergency meeting on the issue of OBC communities may lose political reservation in local bodies in Maharashtra. Imperial data collected over the next 3 years. Later in 2014, Modi government was established at the center, Fadnavis government came to Maharashtra. However, for the last 7 years, neither the Central Government has submitted this data to the court nor the Fadnavis Government has demanded it from the Center for 5 years. At that time, the state government also had the opportunity to gather this information but did not take it. Chief Minister Fadnavis handed over a letter to the Center regarding the provision of data 2-3 months before the end of his tenure. But the information has not been received yet.
In 2020, the Mahavikas Alliance's Thackeray government came to power and the Corona epidemic broke out. This hampered all work. Meanwhile, Chief Minister Uddhav Thackeray called on Prime Minister Narendra Modi to get information about OBCs collected in 2011. OBC communities may lose political reservation in local bodies in Maharashtra
Like the Fadnavis government, the Thackeray government did not receive imperial data from the Center.
OBCs are expected
Before taking to the streets, Devendra Fadnavis, Pankaja Munde and Bawankule should request a change in the constitution so that the OBC-VJ-NT reservation remains permanently unchanged and use their weight to get information from the Center about the socio-economic census 2011 (which is a national asset).
If the Maharashtra government is also delaying in getting data from the central government, it should collect the data of other backward classes at the state level and present it before the court without waiting and wasting time. Awareness of OBC community will be very important from now on. Not arguing about the OBC census would prove detrimental. In the future, educational reservation will also be destroyed.
Reservations in promotions have been stopped, academic scholarships have also started to face difficulties, and in the past competitive examinations, high quality students from OBC, SC, ST were included in the open category. No hostels for children, economic development corporations are on oxygen.
The conspiracy to divide the OBCs into four before the Rohini Commission was started by the Center. Gradually, we can unravel the intrigue of ending the OBC group. Everyone needed to wake up the sleeping lions in us.
The Election Commission has declared elections in 5 districts and started OBC free elections.
Everyone should join this mass movement so that in future we do not have to stand in the cage of the accused as our generation denies. Everyone should send emails, letters and signatures to the Central and State Governments for the census of OBCs and voluntary submissions at the taluka-district level. Namapra representatives from Gram Panchayat, Nagar Panchayat, Nagar Parishad, Mahanagar Palika, Panchayat Samiti, Zilla Parishad should send the resolution. MLAs and MPs should be compelled to take the lead in the fight against OBCs and get justice.
Many should participate in a way that will give them some new ideas. But don't sit still.
The OBC group, which constitutes 52% of the country's population, should not be bound by parties and organizations. How will the rulers understand their value without proving their nuisance value in Indian politics? OBC com
0 टिप्पण्या