Reformers Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj | शिक्षण क्रांती विस्तारित करणारे राजे छत्रपती शाहु महाराज

                    शिक्षणाने आमचा तरणोपाय असे माझे स्पष्ट मत आहे. शिक्षणा शिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञाने बुडून गेलेल्या देशात उत्तम, मुत्सदी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत, म्हणून सक्तीच्या व मोफत शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे हे उद् गार खामगाव येथे झालेल्या अखिल भारतीय शिक्षण परिषदेच्या अकाराव्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून विधान 

करणे व प्रत्यक्ष कृतीतून समाजातील तळागळा पर्यंत शिक्षणाची गंगा पोंचवणा-या  या महान लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26जून 1874 रोजी कागल कोल्हापूर येथे झाला. भारताचा इतिहास लढयाचा, युध्दाचा आहे आणि पंचगंगा नदी तटावर असेच एक महान युध्द झाले जे परकीयांच्या विरूध्द नव्हते तर स्वकियांनविरूद्धचे होते जे साम्राज्याच्या विस्तारासाठी नाही तर सामाजिक न्याय मिळवण्यासाठी अन्यायाविरूध्द झाले होते या युध्दाचे नेतृत्व महान सेनानी छञपती शाहू महाराजांनी केले होते. पूर्वी कार्तिक महिन्यात प्रयाग स्नानासाठी पंचगंगेच्या घाटावर जाण्याची प्रथा होती आणि शाहू राजेही ही प्रथा पाळत असत आणि राजपुरूषांचे स्नान समंञक व्हावे अशी ही परंपरा होती, परंतु पुरोहित वैदिक मंञ म्हणत नसत याचे कारण म्हणजे शाहू राजे क्षञीय होते. याप्रसंगाने राजे अंतर्मुख झाले  तेव्हा त्यांना ही मुठभर लोकांची समाज व शिक्षण क्षेत्रातील मक्तेदारी योग्य वाटली नाही आणि हीच घटना क्रांती करण्यास प्रेरक ठरली आणि शाहू महाराजांनी बहुजन समाजाला जागृत करण्याचे कार्य हाती घेतले. 

                शाहू राजे महात्मा फुल्यांचे सर्वोत्तम अनुयायी होते. आपल्या जीवनाच्या 28 वर्षाच्या कारकिर्दीत शाहू राजांनी महात्मा फुल्यांनी घातलेल्या शिक्षण क्रांतीचा पाया विस्तारण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. तत्कालीन समाजात  विद्येचा अधिकार मूठभर उच्चवणीर्यांच्या कक्षेपुरता मर्यादीत होता.बहुजन समाजाला शिक्षण, उद्योग, नोकरी  ,राजकीय क्षेञ अशा विविध क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शाहू महाराजांनी सार्वञिक शिक्षण प्रसाराचे साधन हाती घेतले. शिक्षण विषयक चळवळीतून सकळ प्रजा शहाणी करून सोडण्याचा शाहूंचा अट्टाहास होता. छञपती झालेल्या शाहू महाराजांनी आपल्या प्रजेवर शिक्षणाचे छञ धरून त्यांच्या विकासाची, उन्नतीची ध्यास धरून आपले छञपतीत्व सिध्द केले होते. माणूसपणाचे आत्मभान हरवलेल्या प्रजेला शिक्षणाने आत्मभान देण्याचा राजहट्ट राजर्षी यांनी धरला व आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत पूर्णत्वास नेला. ते प्रथम माणूस होते ,नंतर राजा माणसाला माणूसपण देण्याची खूणगाठ बांधूनच ते सिंहासनावर विराजमान झाले होते.

         राजर्षी शाहू महाराज हे महात्मा फुल्यांच्या विचारांनी आणि कार्याने प्रभावित झाले होते. महात्मा फुल्यांचा वारसा कार्यरूपाने राजर्षी जपला महात्मा फुले म्हणतात, 

                " विद्येचा अव्हेर कराल ।

                  देशोधडीला जाल।

                   डाग वंशात ।।

   हाच वंशाला लागणारा डाग पुसून काढण्याचा निश्चय शाहू महाराजांनी केला. शिक्षण नाही म्हणून मागासलेपण अमाप आहे. या मागासलेपणातच सर्व दु:खाचे मूळ दडले आहे. आत्मप्रतिष्ठा, आत्मभान, आत्मावलोकन, आत्मबळ, आत्मप्रचिती हे समजणारे शिक्षण हे रसायन होय. शिक्षण ही व्यक्तिविकास आणि समाजोन्नती याची गंगोञी होय आणि ही शिक्षण गंगोञी सर्वसामान्यांच्या दरवाजा पर्यंत नेणे हे त्यांच्या राज्यकारभाराचे उद्दिष्ट होते. ते म्हणतात " माझी प्रजा किमान प्राथमिक शिक्षण घेऊन तयार झाली तरी मी राज्यकारभाराची सूञे प्रजेच्या हातात सोपवायला तयार आहे. "असे म्हणणा-या  या राजाने प्राथमिक सार्वञिक शिक्षणाला महत्व दिले, ते म्हणतात "रयतेतील थोडासा भाग पुर्ण सुशिक्षित होण्यापेक्षा सर्व रयतेला प्राथमिक शिक्षणाचा थोडा तरी अंश मिळाला पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे. रयतेतील मोठा भाग अडाणी राहिला व थोडेसे लोक विचारसंपन्न झाले व प्रजेचे अधिकार या थोड्या लोकांच्या हाती पडले तर एक स्वदेशी ब्युरोक्रसी तयार होणार । "

                  कोल्हापूर संस्थानात प्रत्येक खेडेगावात नवीन शाळा सुरु करणे व या शाळांवर वतनदार शिक्षकांची नेमणे अशी सार्वञिक शिक्षणाची योजना शाहू महाराजांनी इ.सन 1912 साली आखली. पुढे वतनदार शिक्षकांच्या जमिनी मिळवण्याचे प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी पगारी शिक्षकांची नेमणूक केली. त्याच बरोबर शाळांचा खर्च भागवण्यासाठी  देवस्थान आवश्यक खर्च देऊन उरलेली रक्कम शिक्षणावर खर्च करावी असे आज्ञापञ आपल्या संस्थानात सर्वप्रथम काढणारे एकमेव संस्थानिक छञपती शाहू महाराज होय. म्हणजेच तत्कालीन स्थिती  लक्षात घेऊन धोरण ठरवणारा ते थोर राजे होते आम्ही सद्यकालिन स्थिती लक्षात घेऊन विचार केल्यास असे लक्षात येते की आज देशातल्या रयतेला आधाराची गरज असताना आमचे शासन इतर बाबींवर पैसा खर्च करत आहे हा कुठला न्याय आहे रयत महामारीने   हवालदिल  झाली असताना अनेक कोटींचे प्राधान्य न  असलेला  प्रकल्प राबवला जात आहे. तसे राजर्षी शाहू महाराजांचे नव्हते ते प्रसंगानुरूप गरज लक्षात घेऊन धोरण ठरवत व त्यास पूर्णत्वास नेत.त्यांनी आपल्या संस्थानात शिक्षणाच्या सार्वञिकरणाची अंमलबजावणी सप्टेंबर 1916 पासून केली. त्यांनी सुरू केलेल्या शिक्षणाच्या सार्वञिकरणाच्या धोरणा नुसार शिक्षणास योग्य वयाची मुले शाळेत पाठवली पाहीजेत व अशा मुलांची यादी प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसाच्या आत आई-वडीलांनी आपली मुले शाळेत पाठवावीत आणि जे पालक मुले पाठवणार नाहीत त्यांना एक रूपया दंड ठोठावला इतके तळमळीने कार्य शाहू महाराजांनी केले या विषयी समाजमनात आज तळमळ आढळून येते नाही हे आमचे दुर्दैव आहे. दरमहा शाळा तपासणी करून त्याचा रिपोर्ट मामलेदाराने पाठवावा, गावपाटलाने दरमहा एकदा शाळा तपासणीस जाऊन हजर असणा-या मुलांचा आकडा तपासणी वहीत नमूद करून सही करण्याची सक्ती केली. आज आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून मोठा कालावधी लोटला तरी ही शिक्षणाचे सार्वञिकीकरण अजूनही झाले नाही ही आमची शोकांतिका आहे, आज शिक्षणात गळती, स्थगिती, अपंगांचे शिक्षण ,अनुपस्थिती असे अनेक प्रश्न कायम आहेत. सर्वशिक्षा अभियान, साविञीबाई शिक्षण योजना, अहिल्याबाई होळकर योजना, बेटी बचाव बेटी पढ़ाव  ,वेगवेगळया शिष्यवृत्या परंतु तरीही  शिक्षणाच्या सार्वञिकीकरणाचे तीन तेरा वाजलेले दिसून येतात .राजर्षी शाहू महाराजांनी स्वतः जातीने लक्ष घालून शिक्षणाच्या सार्वञिकरणाची अंमलबजावणी   केली त्यामुळे त्यांना त्यात यश प्राप्त झाले. कारण त्यांचे कार्य उत्कटतेतून, तळमळीने झाले होते त्यात वर्तमाना बरोबर भविष्याचाही विचार केलेला होता म्हणूनच त्यांना महात्मा फुल्यांच्या शिक्षण क्रांतीचे विस्तारक 

म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागातील मुलांना प्राथमिक शिक्षणानंतरचे माध्यमिक व उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून निरनिराळ्या जातींची वसतिगृहे काढली. उद्धेश केवळ सर्वांना शिक्षण मिळावे कारण त्या काळात एकञित शिक्षण घेण्यासाठी अनुकूल वातावरण नव्हते. तसेच गावातील देऊळ, धर्मशाळा अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याची योजना आखली.महात्मा फुले यांच्या कार्याचा वसा घेऊन शाहू महाराजांनी स्ञी पुरूष समानतेचा ध्वज सतत उंचावत ठेवण्याचा प्रयत्न केला. पुरूषप्रधान संस्कृतीत स्ञीयांनी उंबरठयाच्या आतच आपले विश्व मर्यादीत ठेवावे अशी सक्ती होती. स्ञीयांचे कार्यक्षेत्र संकुचित करणा-या विचारांना ठोकारून शाहू महाराजांनी समस्त स्ञी जातीच्या मुक्त शिक्षण व्यवस्थेसाठी आग्रही भुमिका घेतली. स्ञीयांना माणूस म्हणून आत्मसन्मानाने जगण्याचे बळ दिले. स्ञी शिक्षणाच्या विविध संधी निर्माण केल्या. पुस्तकी शिक्षणाच्या कक्षेबाहेर जाऊन सबल व सक्षम नारी बनविण्याचा शाहू महाराजांचा प्रयत्न क्रांतीकारक होता. 'मुलींना शाळेत न पाठवणा-या पालकांना माफक दंड करणे, सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा प्रचार करणे, सामाजिक विकासाची बैठक व्यापक व स्ञी-पुरूष समानतेवर आधारित असली पाहिजे यासाठी शाहू महाराजांनी प्रत्यन केले. आज 14 वर्षा पर्यंतच्या बालकांनसाठी शिक्षणाचा हक्क हा कायदा अस्तित्वात आला आहे. आणि याचे बीजरोपण करण्याचे श्रेय शाहू महाराजांना जाते. 

            छञपती शाहू महाराजांनी स्ञीयांचा उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून उच्च शिक्षण घेणा-या स्ञीयांना फी माफीची सवलत मंजूर केली. त्याच बरोबर उच्च शिक्षित स्ञीयांना नोक-या उपलब्ध करून दिल्या. अधिकार पदी स्ञीयांची नेमणूक करण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांनीसाठी शिष्यवृत्या सुरू केल्या, विधवा स्ञीयांना शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून स्वतः ची सुनबाई इंदुमती राणी यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. छञपती शाहू महाराज स्ञी शिक्षणाचे समर्थन करताना म्हणतात, " स्ञी शिक्षित झाली तर कुटुंबाच्या स्वालंबना मध्ये आणि मुलाबाळांच्या संगोपना मध्ये हातभार लागल्याशिवाय राहणार नाही  "शिक्षण विषयक प्रसाराची कठोर अंमलबजावणी करणा-या शाहू महाराजांच्या प्रगत व पुरोगामी विचारांची गरज प्राकृषाने जाणवते परंतु दुर्दैवाने शासन सक्तीचे शिक्षण राबवत असतानाही आज किती तरी बालके शिक्षणापासून वंचित आहेत, आज स्ञी शिक्षण काळाची गरज आहे आणि त्यासाठी शाहू महाराजांच्या धोरणाचा विचार करून जर कार्य केले तर नक्कीच शाहू महाराजांच्या कार्याचे चीज होईल. 

    केवळ जाहीरनामा काढून शाहू महाराज थांबले नाहीत तर त्यांनी शिक्षण समाजाच्या प्रत्येक घटका पर्यंत पोचवण्यासाठी अनेक वसतिगृहांची निर्मिती केली.बहुजन समाजातील अनेक बुध्दिमान मुलांना शिक्षणाची आवड होती; परंतु खेडयात राहणा-या मुलांची राहण्याची, जेवनाची सोय होत नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असे ही बाब शाहू महाराजांनी हेरली आणि त्यांनी इ.सन 1896-97 च्या अहवालात सर्व जातिजमातीच्या विद्यार्थ्यांनसाठी वसतिगृहे काढण्याची योजना जाहीर केली आणि या योजनेचा प्रारंभ 1900 ला हिक्टोरिया मराठा बोर्डिंग सुरू करून केला पुढे शाहू महाराजांनी 1901ला जैन वसतिगृह 1902 ला मुस्लिम वसतिगृह,1903 ला टेक्निकल स्कूल, 1904 ला मराठा स्टुडंटस् इन्स्टिट्यूट, 1007 ला लिंगायत वसतिगृह ,1908 ला मिस क्लार्क होस्टेल, नामदेव वसतिगृह ,इंदुमती वसतिगृह ,प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग 1920 अशा अनेक वसतिगृहांची निर्मिती शाहू महाराजांनी केली म्हणूनच त्यांना वसतिगृहाचे आद्य जनक म्हणून ओळखले जाते. लोकांच्या हल्ल्यात एकात्मतेचे बिज पेरण्याचे कार्य, अंतर हद्यातील कलह नाहीसे करून ऐक्याची बैठक तयार करणे यावर त्यांचा विशेष भर असायचा. ज्ञान हे ' तमसो मा ज्योतिर्गमय ' आहे. सर्व प्रकारच्या अन्यायातून मुक्त होण्यासाठी शिक्षणकार्यात महान कार्य करणारे ज्ञानोपासक म्हणून शाहू महाराजांचे कार्य  गौरवपूर्ण आहे. ज्ञानमृताचे प्राशन तळागळातील सर्व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी अविरत कार्य केले म्हणूनच त्यांना शिक्षण प्रसारक ,ज्ञानसूर्य नावांनी ओळखले जाते. ज्यांनी क्रियाशीलतेने सा-या लोकांचे जीवन आपल्या किरणांनी उजळून टाकले . शाहू महाराजांनी वेद, मंञ अशा शास्ञांचा अधिकार सामान्यांना दिला. एक कार्यवाहक ज्यांनी सा-या ज्ञानाची चौकट बसवली. एक संघर्षमय व्यक्तिमत्व ज्यांनीं संघर्षाचा सामना करत आपल्या ज्ञानकर्माने सर्वांनच्या बुध्दीच्या कक्षा रूंदावण्याचे महान कार्य केले ज्यास आज तोड नाही. 

        शिक्षणातून व्यक्ती मूल्यांची जोपासना, आर्थिक, सामाजिक, धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी  स्वावलंबी, स्वाभिमानी होण्यासाठी शिक्षण सूर्याच्या उजेडाने सर्वाचे जीवन तेजोमय करणा-या महान राजास मानाचा मुजरा ! 


                 डाॅ सत्यभामा जाधव 

       सामाजिक शास्ञे संकुल स्वामी 

         रामानंद तीर्थ विघापीठ नांदेड 

            मो. नंबर:-9403744715

Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur also known as Rajarshi Shahu, was the first Maharaja of the princely state of Kolhapur and a great social reformer. Let's have a look at his life, work and contribution.

Information Of Reformers Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj

Born: June 26, 1874

Place of Birth: Kagal, Kolhapur District, Central Provinces (currently Maharashtra)

Parents: Jaisinghrao Appasaheb Ghatge (Father) and Radhabai (Mother); Anandibai (Adoptive Mother)

Spouse: Lakshmibai

Children: Rajaram III, Radhabai, Sriman Maharajkumar Shivaji and Srimati Rajkumari Aubai

Education: Rajkumar College, Rajkot

Religious Views: Hinduism

Legacy: Social and Educational Reforms, Opposed Brahman Supremacy

Death: May 6, 1922

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या