जातीयवादी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या डीवायएसपी जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावे व सेवेतून निलंबित करावे - मराठा क्रांती मोर्चा

अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला असून त्यामध्ये अंबाजोगाई येथील प्रसिद्ध डॉक्टर सी एम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. यादव यांना जाणीवपूर्वक आरोपी म्हणून गुंतवण्यात आलेले आहे . डॉ. यादव यांच्या कुटुंबीयांना अंबाजोगाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक  जायभाय व त्यांचे सहकारी जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. दि. 6/7/ 2021 वार मंगळवार सायंकाळी साडे नऊच्या दरम्यान डॉ. यादव यांचे चुलत भाऊ झॅक कॉम्प्युटरचे संचालक श्री. विलास यादव यांना डीवायएसपी जायभाये व त्यांचे इतर तीन ते चार कर्मचारी असे सर्वांनी मिळून अंबाजोगाई येथील बबन भैय्या लोमटे यांच्या प्रशांत नगर येथील कार्यालयाच्या जवळ बेदम मारहाण केली.

     तसेच तुम्ही मराठे लय माजला छत्रपतीची गांड भरली आहे एकेरीवर व जातीयवादी बोलुन, बघून घेऊ मादरच्योद, चल पोलीस स्टेशनला, त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करा अशाप्रकारे जातीवाचक भाष्य डीवायएसपी जायभाई यांनी करून स्वतः विलास यादव यांच्या गालामध्ये चापट मारली व व इतर सहकार्‍यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सांगितले.यावेळी  श्री. विलास यादव यांना सर्वांनी मिळुन प्रचंड मारहाण केली व पोलीस स्टेशनला रात्री दहाच्या दरम्यान बळजबरीने घेऊन गेले व पोलीस स्टेशन मध्ये डांबून पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्यांच्या हातावर व पाठीमागील बाजूस डीवायएसपी जायभाये व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मारहाण केली. छत्रपती खुप माजलेत.डॉक्टरचा पत्ता सांग नाहीतर तुझ्या घरातीला बाया पोरांना उचलुन आणेन अशी भाषा वापरुन धमकी दीली. या मारहाणीमध्ये श्री. विलास यादव (झॅक काँप्युटर) हे जखमी झाले. शेवटी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक पोलीस स्टेशनला गेले व त्यांनी श्री. विलास यादव यांना डीवायएसपी जायभाय यांच्या तावडीतून सुटका केली . त्यानंतर श्री. विलास यादव यांना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालय येथे उपचार करून m.l.c. नोंद केली. डिवाय एसपी सुनिल जायभाय  अंबाजोगाईला रुजु  झाल्यापासुन आंबेजोगाई परळी शहरांमध्ये गुंडगिरी प्रचंड वाढली आहे व मराठा समाजाला टार्गेट करून मराठा समाजाच्या विरोधात खोट्या केस करून मराठा समाजाला छ्ळण्याचा प्रयत्न डीवायएसपी जायभाये जाणीवपूर्वक जातीय द्वेशाच्या भावनेतून करत आहे. श्री. विलास यादव यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालेला असून श्री. जायभाये व त्यांचे इतर सहकारी ज्यांनी विलास जाधव यांना मारहाण केली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून श्री. जायभाये व इतर आरोपींना ताबडतोब अटक करावी  तसेच श्री जायभाये व इतर दोषी आरोपींना म्हणजेच पोलिस कर्मचाऱ्यांना ताबडतोब सस्पेंड करावे अशा प्रकारची मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. जोपर्यंत डीवायएसपी जायभाये त्यांचे सहकारी  दोषी पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जात नाही व त्यांना सेवेतून निलंबित केले जात नाही तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चाने सुरु केलेले तीव्र आंदोलन बंद करणार नाहीत व येथे आंदोलन हे कायमस्वरूपी चालूच राहील याचे प्रशासनाने व तसेच मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री. दिलीपरावजी वळसे पाटील साहेब व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी ताबडतोब याची दखल घ्यावी. अन्यथा याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरतील व त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या