हुकूम आणि शहा यांना धडा मिळो, पीडित जनतेचा वेदनांचा साक्षात्कार घडो - युवक कॉंग्रेस आरोग्य राज्यमनव्यक डॉ.निरंजन केशवे

हुकूम आणि शहा ही नाव भारतातील सर्व सामान्य जनता पिढ्यान् पिढ्या विसरणार नाही,दिल्लीच्या सीमेवर चाललेले मागील 7 महिन्यापासूनचे शेतकरी आंदोलन न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यास भेट देण्यासाठी भारताचे पंतप्रधान साहेबांना वेळ नाही ही बाब भारतीय जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे,तसेच कोरोणा महामरी कशी आली कुठे चुकले काय घडले हे सर्व सामान्य जनता बघत आहे. कोरोना महामारी पेक्षा अचानक लॉक डाऊन मुळे ग्रामीण भागातील मजूर,कारागीर व युवक उद्योगासाठी शहरात होते.शहरातून ग्रामीण भागात  निघाले..पाई प्रवास.. खायला अन्न नाही... पोट उपाशी...लाखो लोकांचे हाल झाले..हजारो लोकांनी प्राण गमावले.यांची दखल कोणी घेतली का? कुठे चुकल या बाबींच आत्मचिंतन केलं का? हा मुद्दा नेहमी युवा नेते भारतीय  काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी अनेक वेळा प्रश्न विचारले परंतु त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता कोणालाही वेळ मिळाला नाही,सत्ता जनतेच्या कल्याणाकरिता वापरायची की फक्त सत्ता म्हणून आनंद घ्यायचा? 

 या देशात अनेक नेत्यांनी जनतेच्या स्वातंत्र्या साठी बलिदान दिले त्यांची तरी आठवण ठेवायला पाहिजे.महात्मा गांधी,पंडित जवाहरलाल नेहरू,लाल बहाद्दूर शास्त्री,इंदिराजी गांधी यांनी केलेल्या धाडसी निर्णयामुळे देशातील जमीनदार,जहागीरदार,राजेमहाराजे,भांडवलदार संपवले.देशात भूमिहीनांना जमिनी दिल्या,बेघरांना घरे दिली, भांडवलदारांच्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.या पुण्याई मुळे काँग्रेस पक्षाची सत्ता अनेक काळ टिकली.सर्व राज्यात प्रामाणिक कार्यकर्ते सत्तेत घेऊन त्या सत्तेमुळे जनतेची निस्वार्थ सेवा केली. पुढे राजीवजी गांधी देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी देशाला आधुनिक जगाच्या तुलनेत 21 व्या शतकाकडे नेण्याचे कार्य जोमाने सुरू केले,देशात विघ्नसंतोषी गट सतत छुपे कावे करीत असतात पूर्वी महात्माजी गांधी यांच्यावर ,इंदराजी गांधी यांच्यावर,राजीवजी गांधी यांच्यावर हल्ला करून देशाचे पंतप्रधान इंदिराजी गांधी,राजीवजी गांधी यांना जनतेपासून संपवले या सर्व संकटाचा सामना करीत पक्ष व देशातील जनतेसाठी श्रीमती सोनियाजी गांधी यांनी दाखवलेलं धाडस... देशात आघाडी सरकार चे पंतप्रधान मनमोहन सिंगजी अभ्यासू शांत स्वभावाचे निस्वार्थ व्यक्ती यांनी देशाचे 10 वर्षे पंतप्रधान पद सांभाळले.

 देशात सत्तेसाठी छुपी यंत्रणा वेगवेगळे डावपेच आखून बाबरी मज्जित व राम मंदिर या नावाने देशभर राजकारण झाले....भारतीय जनतेचा अंदाज चुकला...त्यांनी देशाचे पंतप्रधान गरीब कुटुंबातून चहा विकणारा ओबीसी चेहरा गुजरात राज्याचा 15 वर्षे मुख्यमंत्री राहून ना घर ना संसार त्यागी पुरुष म्हणून असणारी ओळख.....महाराष्ट्रात अण्णा हजारे... दिल्लीत केजरीवाल... यांनी आघाडी सरकार विरुद्ध केलेले आंदोलन या सर्व बाबींच्या संधीचा फायदा घेत मोदी साहेब यांनी 'काला धन लाना है गरिबोके खातेमे जमा करना है' या आशेवर भारतातील जनतेला इंदिराजींच्या कार्याची आठवण झाली व त्यांच्या हातून शहरी मालमत्तेवर शिलिंग आणण्याचे कार्य राहून गेले. ते कार्य नरेंद्र मोदी साहेब करतील या आशेने जनता मोदी साहेबांकडे वळली.

 मोदी साहेब पंतप्रधान झाल्यावर काला धन भी नहीं आया परंतु शेतकऱ्यांसाठी काला दीन जरूर आया असे म्हणणे वावगे ठरणार नाही.जनता आण्णा हजारे साहेबांना आणि केजरीवाल साहेबांना व अनेक नेत्यांना विनंती करू लागले हे सरकार सर्व सामान्य जनतेच्या हिताचे नसून,शेतकऱ्यांच्या हिताचे नसून भांडवलदार मंडळींच्या हिताचे आहे. हे आत्मचिंतन जनता करू लागली.कुठे चुकल कसे दुरुस्त करावे या विवंचने मध्ये जनता वेळेची वाट बघत आहे.ती वेळ परमेश्वर,ईश्वर,अल्ल्हा,गौतम बुद्ध,व सर्व देवदेवतांना प्रार्थना आहे हे महामारीचे संकट लवकर जावो. राज्य कर्त्यांना आंदोलन करते शेतकरी,भारतातील पीडित जनतेचा वेदनांचा साक्षात्कार घडो... हुकूम आणि शहा सरकार यांना धडा मिळो...नवीन सरकार शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी यांच्या आशीर्वादाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तरुण नेतृत्व राहुलजी गांधी यांना संधी मिळो... इंदिराजी गांधी आणि राजीवजी गांधी यांचे अपुरे स्वप्न पुरे होवो... हे जनातरुपी परमेश्वर चरणी प्रार्थना! (Let the suffering masses of India realize their pain, let the Hukum and the Shah government learn a lesson)

                                                                                डॉ.निरंजन बाबाराव केशवे, 
                                                                              मु.पो.आष्टा ता.माहुर.जि.नांदेड 
मो. नं. 9423395979

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या