राज ठाकरे तुम्हीच ठरवा पुरंदरे की प्रबोधनकार ?

                   मनसे प्रमुख राज ठाकरे हे त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यात शिवशाहीर ब.मो.पुरंदरे यांचा नेहमीच उदोउदो करतांना दिसतात.परंतु त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव मात्र ते क्वचितच घेतात.याचाच अर्थ त्यांना पुरंदरेंचा खोटा,काल्पनिक व जातीयवादी इतिहास जास्त प्रिय आहे.परंतु आपल्या आजोबांचा सत्य,वास्तववादी आणि समाजजागृती करणारा इतिहास मात्र मान्य नाही.त्यामुळेच आताही ABP माझा या मराठी चॕनेलला दिलेल्या मुलाखतीत जेम्स लेनला खोटी माहिती पुरवून शिवचरित्राचे विकृतीकरण करणाऱ्या पुरंदरेंचे ते गोडवे गातात.परंतु जेम्स लेनची व पुरंदरेंची नालायकी जगासमोर आणणाऱ्या मराठा सेवा संघाचे संस्थापक मा.पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्यावर मात्र अर्थहीन टिका करतात.त्यामुळे राज ठाकरे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात टिकेचा व टिंगलटवाळीचा विषय ठरले आहेत.कारण नसतांना जखमेवरची खीपली काढून त्यांनी स्वतःंवर आफत ओढवून घेतली आहे.


                 ज्यांच्या कुटूंबात

 प्रबोधनकारांसारखे महान समाजसुधारक व इतिहासकार जन्माला आले, त्यांनी प्रबोधनकारांऐवजी जात्यांध व विकृत पुरंदरेंचे गुणगाण करावे ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे.ज्या माणसाच्या *महाराष्ट्र भूषण* पुरस्काराला संपूर्ण महाराष्ट्राने विरोध केला व शेवटी १०० लोकांमधे ज्यांना पोलिसांच्या गराड्यात चोरुन पुरस्कार द्यावा लागला,त्या शिवद्रोही पुरंदरेंना राज ठाकरे डोक्यावर घेवून नाचतात ही शिवचरित्रासोबत केलेली बेईमानी आहे.त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने राज ठाकरेंना नाकारले आहे.पुरंदरे ऐवजी जर राज ठाकरेंनी प्रबोधनकारांना समोर केले असते तर आज त्यांच्यावर अशी वेळ आली नसती.राज ठाकरेंनी बहुजन तरुणांच्या हातात वेळोवेळी दगड,तलवारी,हत्यारे देवून त्यांना पोलिस स्टेशनच्या जाळ्यात फसविले, तर खेडेकर साहेबांनी तरुणांच्या हातात लेखणी,पुस्तके,महापुरुषांचे खरे विचार देवून महाराष्ट्रातील जातीय-धार्मिक दंगली पूर्णपणे थांबविल्या आणि तरुणांना विविध क्षेत्रात सन्मानाचे स्थान मिळवून दिले.हजारो वक्ते,लेखक,विचारवंत,अभ्यासक,कलाकार,प्रबोधनकार,किर्तकार,पत्रकार यांची एक पिढीच निर्माण केली.त्यामुळे आता राज ठाकरेंसाठी दंगली करणारे तरुणच उरले नाही हे खरे त्यांचे दुखणे आहे.म्हणून ते नेहमी चिडचिड करीत असतात व प्रसिध्दीमधे राहण्यासाठी चुकीचे व स्फोटक विधाने करतात.


                 राज ठाकरेंचे सामाजिक,राजकीय आकलन व अभ्यास फार कमी आहे.ते वरवर बोलतात.त्यांचा कोणत्याच विषयाचा खोलवर अभ्यास नाही.पुरंदरे शिवाय ते कधीच दुसऱ्या इतिहासकारांचे नावही घेत नाही.पुरंदरे हे इतिहास संशोधक नाही हेच राज ठाकरेंना माहित नसल्यामुळे ते आपल्या आजोबालाही समजून घेवू शकले नाही.आज जर त्यांचे आजोबा असते तर जेम्स लेन प्रकरणात पुरंदरेंचे समर्थन केले म्हणून राज ठाकरेंना घरातून हाकलून दिले असते व पुरंदरेंना आपल्या लेखणीने घायल केले असते.प्रबोधकारांनी अत्यंत रोखठोक भाषेत भारताच्या अधोगतीला कारणीभूत असलेल्या पुरोहितशाहीवर आसूड ओढून लोकांना जागृत केले व खरा इतिहास सांगून जनतेचे प्रबोधन केले.म्हणूनच लोकांनी त्यांना सन्मानपूर्वक *प्रबोधनकार* ही उपाधी बहाल केली.


                  राज ठाकरेंचे जर आपल्या आजोबांवर खरोखर प्रेम असेल तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रबोधनकारांचे *देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे* हे एक पुस्तक जरी वाचायला सांगितले तरी त्यांचा कोणताच कार्यकर्ता पुन्हा पुरंदरेंचे नाव जन्मातही घेणार नाही हे आमचे आव्हान आहे.इतकी ताकद व उर्जा प्रबोधनकारांच्या साहित्यात असतांना,शिवाजी महाराजांच्या नावावर कोट्यावधींची कमाई करुनही राष्ट्रमाता जिजाऊंचे चित्रही जगाला दाखवू न शकणाऱ्या कृतघ्न पुरंदरेंविषयी राज ठाकरेंना एवढा पुळका का येतो हा संशोधनाचा विषय आहे.उलट खेडेकर साहेब व मराठा सेवा संघाने जिजाऊंच्या चित्राची निर्मिती करुन संपूर्ण जगाला जिजाऊंचे दर्शन घडविले व सत्य इतिहास लोकांंसमोर आणला.त्यामुळे राज ठाकरेंनी एकदा प्रबोधनकारांचे समग्र साहित्य मन लावून एकांतात वाचावे व मगच आपले ज्ञान प्रकट करावे असे त्यांना आमचे आवाहन आहे.त्यांना लगेच लक्षात येईल की, पुरंदरे कामाचे आहेत की प्रबोधनकार !!!

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

प्रेमकुमार बोके 

अंंजनगाव सुर्जी

९५२७९१२७०६ 

१७ आॕगस्ट २०२१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या