Criticism of lokmanya Degree of tilik |कागदोपत्री "लोकमान्य(?)" - मोहन द पाटील.

 "लोकमान्य(?)" बाळ गंगाधर टिळक हे भारताचे सोडाच पण महाराष्ट्राचेही थोर नेते नव्हते. फारतर ते ब्राह्मणांचे पुढारी होते. कारण त्यांची राष्ट्रीयत्वाची व नेतृत्वाची संकल्पना सनातनी ब्राह्मणत्वापलिकडे कधीच गेली नाही. Criticism of lokmanya Degree of tilik 

टिळकांचा जन्म १८५६ चा. काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये मुंबई येथे झाली. तरीही  काँग्रेसच्या स्थापनेत टिळकांचा मुळीच सहभाग नव्हता. परंतु काँग्रेसची वाढती लोकप्रियता व जनाधार पाहून खूप उशीराने म्हणजे १८९० मध्ये ते काँग्रेसमध्ये घुसले व काँग्रेसवर कब्जा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु तो असफल झाला. खूप प्रयत्न करुनही ते कधीच काँग्रेसचे अध्यक्ष अथवा महत्त्वाचे पदाधिकारी होऊ शकले नाहीत. 

स्वदेशी चळवळ अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय, चिदंबरम पिल्ले यांनी सुरू केली.  होमरुल चळवळ डॉ. अॅनी बेझंट व बॅरिस्टर जोसेफ बाप्तिष्टा यांनी सुरू केली. सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केला. शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" ही घोषणा बॅरिस्टर जोसेफ बाप्तिष्टा यांनी दिली. अशी वस्तुस्थिती असतानाही त्यांचे श्रेय मात्र कलमकसायांनी टिळकांना दिले. Criticism of lokmanya Degree of tilik 

भारतीय असंतोषाचे जनक टिळक नाहीत तर इंग्रजी राजवटीच्या दुष्परिणामांवर Drain of Wealth हा अभ्यासपुर्ण ग्रंथ लिहिणारे व दस्तुरखुद्द इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये इंग्रजांच्या राजवटीमुळे भारतात आलेल्या बेरोजगारी, दारिद्र्य आणि विपन्नावस्थेवर अभ्यासपूर्ण सडेतोड व ब्रिटीश सरकारची वाभाडे काढणारी भाषणे करुन इंग्रज सत्ताधा-यांना त्यांच्याच पार्लमेंटमध्ये धारेवर धरणारे दादाभाई नौरोजी हे आहेत. ब्रिटिश सरकारला सिंहाच्या छातीने जाब विचारणारे करारी व स्वाभिमानी नेते फिरोजशहा मेहता होते. पण त्या सर्वांचे श्रेय कलमकसायांनी टिळकांना दिले व टिळकांना कागदोपत्री मोठे बनविले.

टिळक हे पुन्हा पेशवाई परत येण्याचे दिवास्वप्न पाहणा-या सनातनी ब्राह्मणांचे सर्वश्रेष्ठ नेते होते.  ब्राह्मण वगळता एकही ब्राह्मणेतर नेता वा व्यक्ती त्यांचा सहकारी अथवा अनुयायी नव्हता. आरएसएसचे ते परात्पर पितामह आहेत.

टिळक हे तेल्या-ता़ंबोळ्यांचे पुढारी होते ही भलीमोठी लोणकढी थाप आहे. ते कधीच तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी नव्हते. उलट त्यांनी तेल्या-तांबोळ्यांच्या म्हणजेच मागास लोकांच्या न्याय्य हक्कांना आणि अधिकारांना कर्मठ विरोध केलेला आहे.

महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर व पंडिता रमाबाई या समाजसुधारकांना आणि गोपाळ कृष्ण गोखले व महादेव गोविंद रानडे या उदारमतवादी काँग्रेस नेत्यांना टिळकांनी जोरदारपणे विरोध केला. गांधीजींची तर त्यांनी खिल्ली उडविली होती.

टिळकांनी सन १९१६ मध्ये बॅरिस्टर मोहंमद अली जिना बरोबर लखनौ करार करुन मुस्लिमांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कितीही अधिक स्वतंत्र मतदारसंघ देऊन पाकिस्तानच्या निर्मितीची बीजे रोवली. मुस्लिम तुष्टीकरणाला त्यांनीच सुरुवात केली.

टिळकांचे तथाकथित "राष्ट्रीय" शिक्षण म्हणजे हिंदुत्ववादी तालिबामनी शिक्षण होते. सामाजिक सुधारणा, जमीन सुधारणा आणि शैक्षणिक सुधारणांना त्यांनी सातत्याने कर्मठ विरोध केला. सरकारच्या सक्तिच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाला त्यांचा तिव्र विरोध होता. कारण त्यामुळे गरीब अडाणी मागासवर्गीयांची मुले शिकली असती.

टिळक हे पक्के व उघड वर्णाश्रमधर्मवादी होते व मनुस्मृतीचे समर्थक होते. त्यांनी ब्राह्मणेतरांच्या आणि स्त्रियांच्या धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्कांना व अधिकारांना शेवटपर्यंत विरोध केला. सर्व प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आर्थिक व धार्मिक सुधारणांचे ते कट्टर वैरी होते.


टिळक हे भारतीय राजकिय भ्रष्टाचाराचे जनक आहेत. शिवरायांच्या स्मारकासाठी जमवलेल्या सार्वजनिक फंडाचा त्यांनी अपहार केला. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सार्वजनिक कामासाठी दिलेला पुण्यातील "गायकवाड वाडा" त्यांनी कायमचा बळकावला.

टिळकांची स्वराज्य/होमरुल/स्वातंत्र्याची व्याख्या व संकल्पना ही भारतातील

ब्रिटिश सत्तेत ब्राह्मणांना भागीदारी मिळावी एवढ्यापुरतीच मर्यादित होती.

टिळकांनी "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा व इतर तथाकथित जहाल अग्रलेख राष्ट्रवादी भूमिकेतून किंवा देशभक्तीतून किंवा लोकहितातून लिहिले नव्हते तर चक्क संकुचित व खोट्या सनातनी ब्राह्मणी जात श्रेष्ठत्वाच्या व वैदिक धार्मिक मुजोरीतून लिहीले होते.

टिळकांना तीन वेळा तुरुंगवासाच्या शिक्षा झालेल्या आहेत. तथापि, त्या स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व केल्यामुळे अथवा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे झालेल्या नसून त्यापैकी एक बर्वे नावाच्या कोल्हापूरच्या दिवाणाची अब्रूनुकसानी केल्याप्रकरणी, दुसरी शिक्षा ताईमहाराज नावाच्या तरुण विधवेची फसवणूक व बलात्कार प्रकरणी आणि तिसरी शिक्षा पुण्यातील प्लेगच्या साथीत ब्राह्मण जातीच्या व खोट्या धार्मिक भावना भडकावण्यासाठी व हिंसाचारास चिथावणी देण्यासाठी भडक व खोट्या बातम्या आणि ब्राह्मणी अहंकारातून "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" इत्यादि अग्रलेख लिहिल्याप्रकरणी झाल्या आहेत. त्यात कुठेही व कसलेही देशप्रेम/देशभक्ती नाही. 

ब्राह्मणेतरांच्या विशेषतः मागास जातींच्या शिक्षणाला, स्त्रियांच्या शिक्षणाला, नापिकीमुळे दैन्यावस्थतेतील  शेतक-यांना सरकारी मदत करण्याच्या, शेती सुधारणा करण्याच्या आणि शेती व शेतकऱ्यांसाठी कृषी बँक स्थापन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना आणि मुंबईतील कामगारांच्या न्याय्य व वाजवी मागण्यांना जन्मसिद्ध चित्पावन "खोत" असलेल्या टिळकांनी सतत प्रखर विरोध केला होता.

टिळकांनी आयुष्यभर खोत, सावकार, भांडवलदार व ब्राह्मण जातीच्या हितसबंधाच्या रक्षणासाठी काम केले.

शेतक-यांची मुले शिकली तर शेती कोण करणार? कारागिरांची मुले शिकली तर आवश्यक वस्तु कोण बनवणार? कष्टक-यांची मुले शिकली तर श्रमांची कामे कोण करणार? उच्च वर्णियांची सेवा कोण करणार? असले प्रश्न व भिती टिळकांना पडली होती. 

कुणब्यांना विधानमंडळात जाऊन नांगर चालवायचा आहे काय? तेल्यांना विधानमंडळात जाऊन घाणा चालवायचा आहे काय? शिंप्याना विधानमंडळात जाऊन कपडे शिवायचे आहेत काय? .... लोहाराला भाता, विणकराला हातमाग चालवायचा आहे का? असले प्रश्न अथनी येथील जाहिर सभेत टिळकांनी जाहिरपणे विचारले होते.

शाळा शिकल्यावर मागास जातींची मुले बिघडतील, शाळा शिकल्यावर मुली चारित्र्यहिन बनतील व कौटुंबिक पावित्र्यभंग होईल, धर्म व संस्कृती भ्रष्ट होईल, मुलींच्या लग्नाचे वय वाढवले तर मुली बिघडतील असले अनेक शोध टिळकांनी लावले होते.

आज टिळकांना अभिवादन करतांना यांचाही विचार, त्यांचे मुल्यमापन व चिकित्सा व्हायला हवी. Criticism of lokmanya Degree of tilik 

--- मोहन द पाटील. ( Mohan Patil https://www.facebook.com/mdpatil25 ) यांच्या फेसबुक वाल वरुन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या