महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य प्रशासनाला कोविड -19 ची तिसरी लाट हाताळण्यासाठी योजना तयार करण्याच्या सुचना दिल्या आहे.
मुंबई: कोविड -19 ची दुसरी लाट अद्याप कमी झाली नसली तरी जुलै आणि ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. जुलै किंवा ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते, असे पीटीआयने गुरुवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हवाल्याने सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोविड -19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
ते म्हणाले, “महाराष्ट्र ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत आहे. वैद्यकीय ऑक्सिजन तयार करण्यासाठी आणि ऑक्सिजन सांद्रकांची व्यवस्था करण्यासाठी 125 प्रेशर स्विंग अॅडॉर्सप्शन प्लांट बसवण्याचा राज्य प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्य सरकार सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीन सारख्या वैद्यकीय उपकरणे जिथे या सुविधा उपलब्ध नाहीत अशा जिल्ह्यांना देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भविष्यात होऊ नये, आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. मोठ्या ऑक्सिजन प्लांट्सची स्थापना केली जात आहे, ”आढावा बैठकीनंतर ते म्हणाले. पुढील लाट राज्यात आल्यावर ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल तक्रार करू नका, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
0 टिप्पण्या