RR Aba's brother retires from police service; The last day of duty started by saluting the mother
कोल्हापूर : करवीरचे पोलीस उपअधीक्षक (DYSP) राजाराम रामराव पाटील हे आज पोलीस सेवेतून निवृत्त झाले आहेत. ते दिवंगत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांचे सख्खे बंधू आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागल मधील मुरगूड येथे जात शेकडो कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाचे पुरावे दिले होते.
मुरगूड हे मुश्रीफ यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे सोमय्या यांना विरोध करण्यासाठी समर्थक गोंधळ घालण्याची शक्यता होती. मात्र अशा तणावाच्या स्थितीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी राजाराम पाटील यांनी खास दक्षता घेतली होती. किरीट सोमय्या यांची तक्रार मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये राजाराम पाटील यांनीच स्वीकारली होती.
दरम्यान, सख्खे बंधू महत्वाचे मंत्री होते, वहिनी आता आमदार आहेत, घरी देखील राजकीय पार्श्वभूमी आहे अशातही कोणताही मग्रूरपणा न आणता राजाराम म्हणजेच तात्या यांनी आपले कर्तव्य बजावले. तर, पोलीस सेवेतील अखेरच्या दिवशी कर्तव्यावर जाताना त्यांनी आपल्या मातेला सॅल्युट करुन, कृतज्ञता व्यक्त केली. पाटील यांना निष्ठा आणि कामातील तत्परतेसाठी दोनवेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे.
- हे ही वाचा---------------
- मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका, तातडीची सर्वतोपरी मदत पोहोचवा – मुख्यमंत्र्याचे प्रशासनाला निर्देश
- नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा महाराष्ट्र शासन निर्णय
- माहुरगड आता राज्याच्या पर्यटन क्षेत्रात तसेच धार्मिक स्थळामध्ये गौरवाचे केंद्र, रोप वे चे काम आता जलद गतीने पूर्णत्वास येईल
- महाराष्ट्रात विजेच्या गडगडाटासह पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता,प्रशासनाने केल्या खालील सुचना
- कीर्तनकार शिवलीला पाटील बिग बॉस मराठी शोमध्ये भाग घेतल्यामुळे झाल्या ट्रोल
अजित पवार यांनी केल होतं कौतुक
‘स्वत:चा सख्खा भाऊ 12 वर्षे राज्याचा गृहमंत्री असतानाही राजाराम पाटलांनी कधी टेंबा मिरवला नाही. मात्र काही लोकांचे खूप खूप लांबचे नातेवाईक जरी गृहमंत्री असला तरी असा टेंबा मिरवला जातो, जसं काही गृहखातं हेच चालवतात. पण राजाराम पाटील त्यातले नाहीत,’ असं कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजाराम पाटील यांची पिंपरीतील सेवेतून झालेल्या बदली निमित्त आयोजित निरोप कार्यक्रमात केलं होतं.
RR Aba's brother retires from police service; The last day of duty started by saluting the mother
0 टिप्पण्या