संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांचा वैचारिक गोंधळ मुळीच नाही, 100% समाजकारण आणी 100% राजकारण

 

BJP is the best option for the alliance; Role of Sambhaji Brigade Chief Purushottam Khedekar

मराठा सेवा संघाचे मुखपत्र असलेल्या मराठामार्ग च्या ताजा अंकात मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त सदिच्छा देणाऱ्या संपादकीय लेखात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी लीहलेल्या लेखामुळे सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. या लेखात त्यांनी संभाजी ब्रिगेड ला आगामी निवडणुकांसाठी तयार राहण्याची सूचना केलेली आहे. सोबत याच लेखात त्यांनी महाराष्ट्रातील वर्तमान राजकारणाचा आढावा घेत भविष्यात संभाजी ब्रिगेड ला राजकीय युती साठी भाजपा हा पर्याय असू शकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज व्यक्त करताना त्यांनी मांडलेली भूमिका संपूर्ण लेख वाचल्याशिवाय कळू शकत नाही. मात्र अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्या काही अतिउत्साही लोकांनी व पत्रकारांनी अतिरंजित माहिती मध्यामाद्वारे द्यायला सुरवात केलेली आहे. 

 आज सकाळी मराठी news चॅनल वर संभाजी ब्रिगेड व भाजपा युतीची शक्यता वर्तविनारी बातमी प्रसारित करून यासंदर्भात मा. खेडेकर साहेबांची मुलाखत दाखविली. यामध्ये प्रश्न विचारताना पत्रकारांनी कुणीतरी पेरलेले प्रश्न विचारत मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांचा वैचारिक गोंधळ होतो आहे अशी पुष्टीही जोडली. कदाचित या पत्रकाराने मराठामार्ग चे केवळ मुखपृष्ठ बघितले असावे संपूर्ण लेख वाचलाच नसावा असे वाटते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा नाही परंतु पत्रकाराचाच गोंधळ जास्त उडालेला दिसतो. 

   याच लेखात मा. खेडेकर साहेबांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, संभाजी ब्रिगेडचा ब्राम्हणवादा विरोधातील लढा सुरूच राहील त्यात कोणताही बदल होणार नाही. स्वतःला पुरोगामी समजणारे पक्ष संभाजी ब्रिगेड चा केवळ वापर करतात मात्र सत्तेत वाटा द्यायला तयार होत नाही. त्यामुळे राजकीय तडजोड म्हणून भविष्यात संभाजी ब्रिगेड ची भाजपा सोबत युती होऊ शकते /(झाली नाही) असे म्हटले आहे. तसेच ही राजकीय तडजोड एक पाऊल पुढे जाण्यासाठी आहे. हे आम्ही प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते जाणून आहोत. त्यामुळे आमचा कुणाचाही वैचारिक गोंधळ होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

    आणि जर कार्यकर्त्याचा गोंधळ झाला की नाही हे तपासायचे असल्यास  पत्रकारांनी संभाजी ब्रिगेड च्या प्रवक्त्यांना किंवा पदाधिकारी यांना चर्चेत बोलवायला पाहिजे होते. ज्यांचा संबंध संभाजी ब्रिगेडशी नाही पूणे येथील राजेंद्र कोंढरे यांना  चर्चेत विचारून  आमच्या वैचारिक स्थितीचा अंदाज घेणे ही वैचारिक दिवाळखोरी आहे. 

   मराठा सेवा संघाच्या पंचसूत्री मध्ये राजसत्ता ही सुरवातीपासूनच मांडण्यात आली आहे. हे प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला आमचे उद्दिष्ट व तिथपर्यंत जाण्यासाठीचे मार्ग याबाबत पूर्ण कल्पना आहे. संभाजी ब्रिगेड च्या नेतृत्वाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. त्यामुळे शिवविचार पुढे नेण्यासाठी गरज पडेल तेव्हा तडजोड करणे हा आम्हाला शिवरायांनी घालून दिलेला आदर्श आहे. राजकारणातील तडजोड म्हणजे तत्वाशी तडजोड नसते.  साहेबांच्या याच लेखात आजवर भारतीय राजकारणात झालेल्या विविध युती सरकारांचा उल्लेख आलेला आहे त्यांच्यासाठी कोणत्या मोजपटी लावायच्या हा प्रश्नच आहे.

संभाजी ब्रिगेड च्या या भूमिकेमुळे संभाजी ब्रिगेडचे नाव वापरून विविध राजकीय पक्षांकडे पाणी भरणाऱ्या काही भुरट्या लोकांची आता अडचण निर्माण होणार आहे ही खरी गोम आहे. तसेच स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या राजकीय पक्षांनी गेली अनेक वर्षे गृहीत धरलेली मराठा सेवा संघाने घडवलेली vote बँक हातातून निसटते की काय अशी भीती कदाचित त्यांना वाटायला लागली आहे. 

संभाजी ब्रिगेड ज्या वैचारिक भूमिका घेऊन आजवर प्रवास करीत आलेली आहे. त्यात तसूभरही बदल होणार नाही मात्र संभाजी ब्रिगेड ला  असलेल्या राजकीय निर्णयाच्या स्वातंत्र्यावर कुणीही हक्क सांगू नये. आज महाराष्ट्र व देशात अनेक प्रश्न आहेत त्यासाठी संभाजी ब्रिगेड ला येणाऱ्या काळात काही ठोस भूमिका घाव्या लागणार आहेत. त्या घेतल्या जातील व  त्याला आम्ही कार्यकर्ते म्हणून बांधील राहू.

BJP is the best option for the alliance; Role of Sambhaji Brigade Chief Purushottam Khedekar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या