दि. ६ ऑक्टोबर रोजीचा ऐतिहासिक शिवकालीन घडामोडी शिव दिनविशेष

                                                                                                              ६ ऑक्टोबर इ.स.१६७० ( कार्तिक शुद्ध द्वितीय, शके १५९२, संवत्सर साधारण, गुरूवार ) 
  महाराजांनी सुरत सोडली. बिनबोभाट तळ उठवून ससैन्य स्वराज्याकडे कूच केली. शेकडो घोडी, हजारो बैल, खेचरे, यांचेसह हत्यारबंद सैनिकांच्या गराड्यात सुरतेची लूट स्वराज्याच्या दिशेने कूच करत होती. एक संकल्प मनी धरून महाराज स्वराज्याकडे परतत होते. 

History On Shivkal events on 6th October Shivdin Vishesh

 ६ ऑक्टोबर इ.स.१६७६ "दक्षिण दिग्विजय मोहीम"
छत्रपती शिवाजी महाराजांचे दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडावरून कर्नाटक दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी प्रस्थान केले.! त्यावेळी मोघलांची एक लढाई नळदुर्ग भागात, आदिलशाही विरोधात सुरु होती. याच परिस्थितीचा फायदा घेत महाराजांनी मोहिमेचा श्रीगणेशा केला. ह्या मोहिमेत महाराजांसोबत २५००० घोडदळ आणि ४०००० पायदळ होते. मोहीमेच्या सुरुवातीला महाराज आंबोली भागातून देशावर आले आणि इथेच त्यांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक भाग घेऊन महाराज स्वतः भागानगरकडे रवाना झाले. आणि दुसरा भाग हंबीरराव मोहित्यांकडे सोपवला. हंबीररावांनी आदिलशाही भागातला भलामोठा प्रदेश लढाई करून जिंकला आणि तिथून खंडणी गोळा करून ते कुतुबशाही मुलुखात शिरले. मोहित्यांना आदिलशाही मुलुखात एका ठिकाणी निकराची लढाई द्यावी लागली. ती लढाई म्हणजे हुसेनखाण मियाणाविरुद्ध, दुआबातील कोप्पळ ह्या महत्वपूर्ण किल्ल्याच्या परिसरात. हुसेनखानाने मोहित्यांना अनेपेक्षितरित्या कडवा प्रतिकार दिला होता. अटीतटीच्या लढाईत मोहित्यांनी पराक्रमाची शर्थ करून मियाणाचा पराभव केला आणि त्याचे सर्व उच्चप्रतीचे हत्ती, घोडे, युद्धसामुग्री अन भलामोठा खजिना हस्तगत केला. नंतर ते पुढे महाराजांना भागानगरमध्ये जाऊन मिळाले. महाराजांचा भागानगरपर्यंत (कुतुबशाही) चा प्रवास आजतागायत उलगडलेला नाही. महाराजांनी मोहिमेबद्दल प्रचंड गुप्तता पाळल्याने त्याबद्दल जास्त कागदपत्रं उपलब्ध नाहीत. महाराजांचे भागानगरात प्रवेशाआधीच भव्यदिव्य स्वागत झाले. कुतुबशाहीच्या पातशाहांनी महाराजांचे स्वागत करायला मादण्णा आणि आकण्णा यांना पाचारण केले होते. त्यांनी दोन चार गावे पुढे येऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे यथोचित आदरसत्कार केले. तब्बल एक महिना भागानगरीत कुतुबशाहने महाराजांची आणि त्यांच्या सैन्याची अगदी योग्य बडदास्त ठेवली होती. महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिल्याप्रमाणे, कुतुबशाहीच्या रयतेस कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ह्यावर पातशाह अधिकच खुश झाला आणि त्यांनी महाराजांसोबत तह केला. त्या तहा अंतर्गत कुतुबशाहीच्या हद्दीत महाराजांच्या मोहिमेसाठी होणारा संपूर्ण खर्च कुतुबशाही उचलणार असे ठरले. 

  ६ ऑक्टोबर इ.स.१६८६ सण 1685 नंतर इंग्रजानी आपली दुटप्पी वागणूक बदलत छत्रपती शंभूराजेंशी मैत्री ठेवण्याचे धोरण ठेवले होते. मुघलांशी बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर लंडनहून सुरतकर आणि मुंबईकर यांना शंभूराजेंशी मैत्री राखण्यास सांगण्यात आले होते तसेच त्यांना तोफखाना आणि दारुगोळाही पुरवण्यास कळवले होते. याच दरम्यान सिद्दीच्या हालचाली पूर्वीप्रमाणेच सुरू होत्या.1686 साली सिद्दीने केलेल्या लुटीने चेऊल प्रांतातील रहिवासी परागंदा झाले होते व मुलुख ओस पडला होता. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सिद्दीने मराठ्यांचे काही किल्ले घेतले. त्यातील एका गडावरील तोफ मुंबईहून दुसरीकडे नेण्यासाठी त्याने मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरकडे हाऊसर्स, 2 कॅप्टन आणि दोन मोठे ठोकळे मागितले होते. पण शंभूराजेंशी बदललेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरने त्याला परवानगी दिली नाही. 

  ६ ऑक्टोबर इ.स.१७७६ रोजी पांडुरंग पटवर्धनराव फौजेसह मिरजेहून हैदरवर (धारवाड वर) स्वारीवर निघाले. त्यास कृष्णराव पानसे, शिवराम मामा घोरपडे, गुत्तिकर, निळकंठ राव शिंदे, नरगुंदीचे देसाई हे सरदार वाटेत मिळाले. ही सर्व मराठी फौज प्रांतात आलीसे पहाताच हैदरअल्लीच्या लोकांनी धारवाडचा वेढा उठऊन ते पळून बंकापुरास गेले. फक्त तीन हजार कन्नडिगे धारवाडच्या रानात मराठ्यांना त्रास देण्याकरिता लपून राहिले. डिसेंबर महात मराठ्यांनी धारवाड प्रांतातील सर्व ठाणी घेतली.

History On Shivkal events on 6th October Shivdin Vishesh


  लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती  
" हर हर महादेव जय श्रीराम "  "जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या