आपल्या बळावर शिवसंस्कार व्हावे म्हणून आठ महिन्यांच्या गर्भवतीने चढला रायगड !


बाळाच्या काळजीने रायगडाचा कडा खाली उतरून जाणारी हिरकणी इतिहासात प्रसिद्ध आहे, तिचा शिवरायांनी राजदरबारात सन्मान केला आणि शिवराय म्हणाले; तुझ्यासारखी आई जोपर्यंत आमच्या स्वराज्यात आहे तोपर्यंत आमचं स्वराज्य सुरक्षित आहे. जगातील सर्वोच्च संस्कार ज्या ठिकाणी बघायला मिळतात ते सर्वोच्च पीठ जर कोणतं असेल तर ते म्हणजे रायगड.


मराठयांच्या घरात जन्माला येणार बाळ जन्मजात शिवप्रेमाचे शिवसंस्कार घेऊन जन्माला येते कारण मराठयांच्या लेकी, बाळ गर्भात असतांना त्याच्यावर शिवसंस्कार करतात. आमच्या वहिनी सौ.कोमल अभिजीत पाटील यांनी आपल्या बाळावर शिवसंस्कार व्हावे म्हणून असंच वेड धाडस केलं.

आपल्या गर्भात असलेल्या बळावर शिवसंस्कार व्हावेत म्हणून आमच्या वहिनी आठव्या महिन्यात रायगडावर शिवचरणी नतमस्तक होण्यासाठी गेल्या. हा फोटो बघून मला मनात धस्स झालं, कारण आठव्या महिन्याच्या गर्भारपणात गडावर जर काही त्रास झाला असता तर…! आपल्या बळावर शिवसंस्कार व्हावे म्हणून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या या मातेला मनाचा मुजरा. Komal Patil

स्वराज्य माता राजमाता जिजाऊ
स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज

सौजन्य स्टारमराठी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या