समतेचा महामेरू राजा +ऋषी शाहु महाराज स्मृती दिन

आजच्या दिवशी समतेचा सुर्यास्त सनातनी वर्गाच्या विरोध न जुमानता मराठा, मुस्लिम,  दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावनारे, मागासवर्गीयांच्या शिक्षणावर अधिक भर देणारे, शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे, स्त्री शिक्षणासाठी राजआज्ञा काढणारे,


 जातीभेद उच्चाटना साठी आंतरजातीय विवाहास मान्यता देणारे, राधानगरी धरणाची उभारणी करून शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देनारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी व मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य करणारे, बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ असणारे, जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड ठोठावनारे, अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या देणारे, पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला मान्यता देणारे. देवदासी प्रथा बंद करनारे. आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लाऊन 100 मराठा-धनगर विवाह लाऊन देणारे  लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृती दिनानिमित्त त्यांचे पवित्र स्मृतिस व कार्यकर्तृत्वास विनम्र अभिवादन...🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या