कोळवाडी येथे लोकअदालत बाबत जनजागृती व कायदेविषयक माहिती शिबीर संपन्न

Online team :- शिरूर न्यायालयाचे न्यायाधीश मनगिरे साहेब यांनी गावकऱ्यांना केले सविस्तर मार्गदर्शन दिनांक25/09/2021 रोजी शिरूर येथे लोकअदालत आयोजित केलेले असून या लोकअदालत बाबत जनजागृती करण्यासाठी व कायदेविषयक माहिती देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने आज कोळवाडी येथे जनजागृती शिबिर आयोजित केले होते.


 यावेळी शिरूर न्यायालयाचे न्यायाधीश मनगिरे साहेब, तसेच शिरूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍड. नागरगोजे साहेब, विधी सेवा समिती व बाल संरक्षण समितीचे सदस्य समीर पठाण यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. 


यावेळी ऍड.हरिभाऊ कोठुळे, ऍड.रफिक पठाण,ऍड महेश भिलारे,पोलीस कॉ. गुजर साहेब,शिरूर न्यायालयाचे,शरद माने साहेब,नवनाथ चव्हाण साहेब,येवले साहेब यांचेसह कोळवाडीच्या सरपंच पूजा नेटके , उपसरपंच नारायण मानकर व गावातील ग्रामस्थ यांनी आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित राहिले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश भिलारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री साईनाथ नेटके यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या