26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सर्व शहीद जवानांना विनम्र अभिवादन.

26/11 चा हल्ल्याला आज तब्बल 10 वर्षे झाली आहेत २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.हा जागतिक स्तरावर लक्ष वेधनारा मुंबईच्या तथा देशाच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला तुकाराम ओंबळे या जहाबाज पोलीस शिपायांनी जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.


दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला.
पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल कसाब हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्कर ए तोय्यबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले, व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले, व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला. परंतु ७ जानेवारी २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.
या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या. आहेत. ताज ट्रायडंट ओबेरॉय हॉटेल वर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामधून तसेच सीएसटी रेल्वे स्टेशनवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यावरून अनेक भारतीय जवानांचा किंवा महाराष्ट्रातील असामान्य व्यक्तींच्या
समान्य व्यक्तींनी आपले प्राण या हल्ल्यामध्ये प्राण गमावले होते तसेच त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानांकडून तसेच महाराष्ट्र पोलिसाकडून अतिशय चोख कामगिरी व उत्तर दिलेले होते त्यापैकिच स्वतः अंगावर गोळ्या झेलत जिवाची पर्वा न करता एका अतिरेकीला जिवंत पकडणारे महाराष्ट्रातील असणारे पोलीस शिपाई तुकाराम ओंबळे यांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय होते.
त्यामध्ये महाराष्ट्र पोलीसाचे तीन मोठे अधिकारी कामठे करकरे साळसकर यांंच्यासह दिल्ली येथून आलेल्या विशेष जवान कंमाडोच्या पथाकातील  मेझर उनिकृष्नन सह एकुण 10 जण शहिद झाले होते.
    आज सदरील घटनेचा स्मृती दिन म्हणून सर्व हल्यातील मृत सामान्य नागरिकासह शहिद जवानांना विनम्र अभिवादन...🙏💐
शब्दरचना तथा माहिती संकलक
भाऊसाहेब नेटके
मो. 9527276262
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या