मराठा स्वराज्य विस्तारक, साम्राज्याधिष, भरतवर्षसम्राट छत्रपती थोरले शाहू महाराज

मराठा साम्राज्याचा हा नकाशा इ सन १७५९ सालचा दाखवुन नानासाहेब प्रधान यांनीच विस्तार केला असा आभास पसरवला जातो... परंतु इ सन १७०७-१७४९ या थोरले छत्रपति शाहु महाराज यांच्या कार्यकाळात हा विस्तार खुद्द छत्रपती शाहु महाराजांनी आपल्या मातब्बर सरदार मंडळींच्या मदतीने करवुन घेतलेला आढळतो.... थोरले छत्रपति शाहु महाराज यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याच्या विस्तारात फक्त अटक मोहिमेची भर पडलेली आहे...म्हणजे सदरील मोहिम वगळुन मराठा साम्राज्याचा विस्तार हा थोरले छत्रपति शाहु महाराज यांच्या कार्यकाळात त्यांनीच घडवुन आणलेला दिसुन येतो....... असे चुकीचे नकाशे तयार करवुन छत्रपती शाहु महाराज यांचा इतिहास दडपवण्याचा प्रकार केलेला दिसुन येतो.. तो आता समोर येत आहे....

     थोरले छत्रपति शाहु महाराज यांच्या कार्यकाळात जो प्रांत मराठा साम्राज्यात सामील होता...तो पुढील काळात नानासाहेब प्रधान यांनी गमावलेला दिसुन येतो...तो शाहु कार्यकाळातील नकाशात आवश्य येईल !!!!

#जय_शाहु#


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या