सहा महिन्यांत शासनाच्य दोन मोठ्या पुरस्कारानां हात घालणारा गावखेड्याचा पत्रकार सुर्यकांत नेटके

भावा तु ग्रेटच रे...
गावखेडयातून लिहता होत, प्रमाणिकपणे काम करत माझा बालपणापासूनचा सहकारी भाऊ अर्थात सूर्यकांत नेटके यशस्वी होत अाहे. चार महिन्यापुर्वी राज्य शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार अाणि आता राज्य शासनाचा वसंतराव नाईक  शेतीमित्र पुरस्कार प्राप्त करत कार्यकतृत्व सिद्ध केलं. तुझ्या प्रमाणिकपणाचे हे यश आहे.

आम्ही पहिलीपासून अगदी पदवीपर्यत सोबत शिकलेलो. शाळेत शिकत असताना हाॅटेलमध्ये काम करुन शिकणाऱया सूर्यकांतचा संघर्ष मी पाहिलेला आहे. अगदी कमी वयात, शाळकरी जीवनात लिहता झालेला सूर्यकांत कविता, कथेतून जनवेदना मांडायचा याचे आम्हालाही अप्रुट वाटायचे. पुढे काहीही सबंध नसलेला सूर्यकांत पत्रकार झाला. खेड्यात लिहतानाही अाणि त्याच काळात रोजगाराचाही शोध घेताना त्यांने कोणतेही काम करण्यात कमीपणा मानला नाही. कायम मदत करण्याची भावना ठेवणारा आणि प्रत्येक बाब आपली समजत पत्रकारितेच्या काळात
त्याने गावांत असो वा बाहेर, सगळ्याच बाबीत कित्येकांना मदत केली. त्याचा बरयाच बाबतीत फायदाही झाला.   दुसऱया भागात जाऊन यश मिळवणे सोपे नाही. आमच्या कोळवाडी गावांच्या मातीचा तो गुण आहे. कोळवाडीच्या तरुणांना वेगवेगळ्या भागात यश मिळवलेले आहे. नगरमध्ये
पत्रकारिता करत असताना चार-पाच महिन्याच्या कालावधीत राज्य शासनाचे दोन मानाचे दोन पुरस्कार मिळवणे सोपे नाही. असे पुरस्कार मिळवणारा सूर्यकांत एकमेव पत्रकार अाहे. नावलौकीक होऊनही स्वतःचे साधेपण, आपुलकी अाणि आदब कायम जपलेल्या सूर्यकांतला त्यामुळेच तू ग्रेट अाहेस असेच म्हणावे वाटते....खूप अभिनंदन ....
-----
भाऊसाहेब आश्रुबा नेटके
जिल्हा प्रवक्ता
मराठा सेवा संघ
नांदेड
---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या