शेतकऱ्याांना सल्ला - भुईमुग, मुग, उडीद, मका, बाजरीसाठी आहेत हे वान फायद्याचे


महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (जि. अहमदनगर) ः महाराष्ट्रात मोसमी पावसाचे आगमन झालेय. पेरण्याची तयारी सुरु  आहे. चांगला आणि पुरेसी ओल तयार करणारा पाऊस झाला की पेरणी करावी असा कृषीतज्ज्ञ सल्ला देत आहेत. खरिप पेरणी करण्यासाठी भुईमुग, मुग, उडीद, मका, बाजरीसाठी कोणते वान चांगले आहेत याबाबत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे.  


भुईमुगासाठी जमीन: मध्यम, भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागत: एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या द्याव्यात. खरिप पेरणीसाठी एस बी-११, जे एल-२४ (फुले प्रगती), टी अे जी-२४, जे एल-२२० (फुले व्यास), जे एल-२८६ (फुले उनप), टी पी जी-४१, टी जी-२६, जे एल-५०१, फुले आर एच आर जी-६०२१, फुले उन्नती, जे एल-७७६ (फुले भारती) या वाणांची निवड करावी. 


मूग व उडीदासाठी जमीन: मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी. पूर्वमशागत: चांगली पूर्वमशागत ही मूग आणि उडीदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे. यासाठी उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी. मूगामध्ये वैभव व बी पी एम आर-१४५ हे दोन वाण भुरी रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत. खरिप पेरणीसाठी उडीदाचे टी पी यू-४ व टी ए यू-१ हे वाण वापरावेत. 


बाजरीसाठी पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामु हा ६.२ ते ८ असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते. पूर्वमशागत करताना जमिनीची १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर प्रती हेक्टरी ५ टन / १० ते १५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावे. खरिपासाठी संकरीत:  फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती व सुधारित:  धनशक्ती वानाची पेरणी करावी. 

मकासाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची जमीन पूर्वमशागत: एक खोल नांगरट, २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन १० ते १ टन प्रती हेक्टरी शेणखत/ कंपोस्ट खत यांचवेळी शेतात मिसळून घ्यावे. हिरवळीचे खत गाडले असल्यास शेणखत/ कंपोस्ट खताची जरूरी नसते असे विद्यापीठातून  सांगितले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या