परंपरा आणी काळ

                 परंपरा आणी काळ

आज दिवाळी पाडवा तथा बलिप्रतिपदा बळीराजाच्या स्मरणाचा हा दिवस आहे. एक न्यायप्रिय, प्रजापती, प्रजादक्ष, दानशूर सर्व गुण संपन्न सर्व वैभव संपन्न राजा होता. त्याचे स्मरण म्हणून कृषी प्रधान संस्कृती मध्ये मृगनक्षत्रा नंतर कसलेल्या जमिनीतील पिक हतावर येण्याची ही वेळ असते. तसेच पुर्वी धो धो पडणारा पाऊस व दळणवळणाची अपुरे साधन यामुळे गाव सोडलेले नसायचे त्यामुळे पै पाहुणे यांना ही भेटता यायच नाही. सासुरवाशीण घरची लक्ष्मी म्हणून काम सुगीचा झाल्यावर भाऊबीज निमित्त सर्वजण पै पाहुण्यांना कडे जातात एकमेकांना भेटतात.महाराष्ट्र मध्ये साजरे होणारे सर्व सण वार हे कृषी संस्कृतीशी निगडित असून खरीप हंगामातील मृगाच्या पेरणी पासून नाग पंचमी, बैलपोळा ते दिवाळी हे सर्व सण जसा खरीप हंगाम बहरत जाईल तसे तसे साजरे होतात. आणी या खरीप हंगामातील शेवटाचा ते रब्बी हंगामा सुरू होण्याचा आगोदर चा काळ म्हणजे हा काळ या नंतर रब्बी हंगामाची सुरवात झाल्यावर जसं जसं पिक बहरत जाईल तसं  सट, संक्रांत ते पिक घरात येईपर्यंत आणी वर्षाचा शेवट गुढीपाडवाने होते. हे सर्व कृषी प्रधान संस्कृती चे दर्शन घडवत एकत्र येऊन आनंद साजरा करण्याच दिवस आहेत. जीवन जगताना निसर्ग व व्याव्हारची सांगड घालत आपली  संस्कृती, परंपरा जतन करण्यात येते. काळ व पिढ्या बदलत असताना आजच्या परस्थिती जगताना प्रत्येक क्षेत्रात प्रगतशील च्या नावाखाली नविनीकरण, औद्योगिककरण आपोआप  स्विकारल्या जाते. निसर्गाचा अवमेळ, व्यापारी शेतीच्या नावाखाली पारंपरिक शेती करण्यात झालेला बदल, फुटलेली कुटुंब पध्दती, अनेक वैचारिक प्रवाह. शिक्षणात झालेला बदल, सुधारणावादी चळवळीचे फुटलेलं पेव सध्या या सर्वांचा मेळ घालताना व परंपरा जोपसतानां मानसाची घालमेल होत आहे. मानुस म्हणून आपली प्रत्येकांची हे जपण्याची जबाबदारी आहे.
      आज आपणा सर्वानां बलिप्रतिपदा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🙏

                                   भाऊसाहेब नेटके पाटील
                                  शिवप्रस्थ प्रतिष्ठान महाराष्ट्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या