नांदेडच्या ग्रामीण भागात कोरोनाचा नवा संशयित, लक्षणावरुन कोरोना लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज, उद्या येईल चाचणी अहवाल

नांदेड :  नायगाव येथील तरुण कामसाठी काही दिवसापुर्वी पुणे येथे स्थलांतरित झाला होता.कोरोना संसर्गजन्य आजारच्या सावटामुळे देशात लागू केलेली आणीबाणीच्या धर्तीवर त्याने 21 मार्च रोजी पुण्यावरून स्वगावी आला होता. त्याच्या हातावर  होमकोरोनटाईन करण्यात आले होते . परंतु सदरील तरुण होम कोरोनटाईन धाब्यावर बसवून गाव फिरल्याचे समोर येत आहे. कारण उमरी तालुक्यातील आब्दुलपुरवाडी येथे आपल्या सासरवाडी येथे आला होता. त्याठिकाणी त्याची तब्बेत खालवल्याने उमरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुगणांचे लक्षण सर्दी, ताप, खोकला , श्वास घेण्यासाठी त्याला त्रास होतानाचे  आढळुन आल्याने त्याला नांदेडला हलविण्यात आले आहे .

 सविस्तर वृत्तांत असा की, आज दि ३० मार्च रोजी पहाटे त्याची तब्येत फारच बिघडल्याने त्याला पहाटे४-०० वाजता उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय आधिक्षक डॉ. शंकर चव्हाण यांनी त्याच्यावर उपचार केले. ताप सर्दी ,खोकला ,श्वास घेण्यासाठी त्रास होत होत हे सर्व लक्षण त्याच्यात आढळुन आल्याने तो कोरोना संशयित असल्याचे डॉक्टर कडुन सांगण्यात आले असुन त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांच्या देखरेख खाली पाठवुन देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आधिकारी डॉ. माधव विभुते , डॉ. .मारोती चंदापुरे , डॉ. आशिष कदम यांनी दिली असुन उमरी तालुक्यात कोरोना संशयित रुग्ण आढळुन आल्याने तालुका प्रशासन डॉक्टर आरोग्य विभाग सर्तक झाले असुन उमरी तालुक्यातील अब्दुल्लापुरवाडी येथे तो संशयित त्याच्या सासरवाडीत थांबला होता त्या कुटुंबातील सर्व लोकांना वीस दिवसासाठी होमकोरोटाईन करण्यात आले असुन ते घर बाहेर पडु नये तसेच गावचे लोक कोणीही त्या कूटुंबाला भेटु नये असा कडक इशारा प्रशासना च्या वतीने देण्यात आला आहे. त्या कोरोना संशयित रुग्णांच्या गळयातील थुंकीचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले असुन उद्या दि३१ मार्च रोजी त्याचा रिपोर्ट येणार असल्याची माहीती उमरी चे वैद्यकिय आधिक्षक डाॅक्टर शंकर चव्हाण यांनी दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या