पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 12 वी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णय आज संध्याकाळी बैठकीत होणार आहे

 


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 12 वी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णय आज संध्याकाळी बैठकीत होणार आहे. सर्व राज्ये आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या या बैठकीत त्यांना 12 वी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भातील शक्य त्या सर्व पर्यायांची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे देशातील लाखो विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. (Prime Minister Narendra Modi will chair an important meeting regarding Class 12 Board Examinations)

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल आज दुपारी २ वाजता सीबीएसई (cbse) मंडळाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार होते. या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर देशातील इतर शिक्षण मंडळ आपल्या बारावीच्या परीक्षा संदर्भात आपल्या स्तरावर निर्णय जाहीर करणार होते. मात्र, केंद्रीय शिक्षणंत्री रमेश पोखरियाल यांना उपचारांसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पोस्ट कोविडच्या लक्षणांचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र आता शिक्षणमंत्र्यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे हा निर्णय पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता सगळ्यांच्या नजरा या मोदींच्या बैठकीकडे लागल्या आहेत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) व ‘कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (CISSA) यांच्या प्रस्तावित इयत्ता बारावीच्या परीक्षांबाबतचा अंतिम निर्णय आज जाहीर होणार होता. पूर्ण परीक्षाच रद्द करण्याऐवजी अर्ध्या किंवा दीड तासाची परीक्षा घ्यावी याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे आजच याबाबत घोषणा करतील असे मानले जात होते. न्यायालयाने मागील वर्षीपेक्षा या वर्षी संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचे सांगत गुरुवारपर्यंत सुनावणी स्थगित ठेवली. न्यायालयाच्या निकाला आधीच केंद्र सरकार निर्णय घेईल, कारण केंद्राचा निर्णय जवळपास झाला आहे, असे सूत्रांनी सांगितलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या