राज्याभिषेक दिन शिवरायांचा.... सुरु केला मावळ्यांनी... प्रमोशन मात्र वंशजांचे - शिवव्याख्याते हर्षल बागल

अखंड हिंदुस्थानच्या पहिल्या स्वातंत्र दिनात घुसलं राजकारण

न मिळणाऱ्या आरक्षणावरुन मराठ्यांची व्होटिंग बँक लुटण्याचा फडणविसांचा मनसुबा
             हर्षल बागल


सहा जुन हा अंखड भारताच्या इतिहासात मुघल साम्राज्याला ऊध्वस्त करित  शहाजी राजे सांरख्या सरदाराच्या पोराने म्हणजे शिवाजीराजांनी  स्थापन केलेल्या राज्याचा -स्वराज्याचा पहिला स्वातंत्र दिन म्हणजे राज्याभिषेक दिन आहे. शिवाजी महाराज येथील धर्म व जात व्यवस्थेला लाथाडुन स्वताचा राज्याभिषेक करुन घेत या रयतेचे छत्रपती बनले.  तो सुवर्णक्षण म्हणजे सहा जुन चा राज्याभिषेक दिन . रायगडावरील माती रक्ताने माखलेली पण याच मातीला राजकारणाचा वास कधी लागला हे मावळ्यांना याची भनक देखील लागली नाही.  छत्रपती... भगवा... स्वराज्य या भावनिक शब्दांचा वापर करित शिवराज्याभिषेक सोहळ्यात स्वताचे प्रमोशन युवराज संभाजीराजे यांनी केले. वास्तविक पाहता राज्याभिषेक दिन ऊत्सव करण्यास सुरवात कुणी व केव्हा सुरु झाला ? ऊत्सव साजरा करताना काय अडचणी आल्या? रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीत पुतळा कधी व कुणी बसवला ? रायगडावरिल राज्याभिषेक सोहळ्याचे कर्तेकर्वीते कोण आहेत व आत्ता राजकाणाच्या नादी लागुन मराठ्यांचा वापर छत्रपती या भावनिक व अस्मितेच्या मुद्यावर कोण करित आहे. हे राज्यातील जनतेला नव्याने सागांयची गरज नाही.

       पुर्वी राज्यात भाजपाने स्वताकडे ओबीसी वळवण्यासाठी गोपिनाथ मुंडे , महादेव जानकर , गोपिनाथ पडळकर , हे अस्त्र वापरले , त्यानंतर वंचित ची निर्मीती केली. काँग्रेस राष्ट्रवादीकडील ओबीसी दलित व मुस्लिम व्होट बँक काढणासाठी वंचित व एमआयएम ही पुर्वनियोजित युती घडवुन आणली. आत्ता मी पुन्हा येईन या आँपरेशनसाठी आरक्षणाच्या मुद्याचा वापर केला जात आहे. संभाजी राजे यांना छत्रपतींचे वंशज म्हणुन पुढ करायचे मराठा व्होट बँक लुटायचे हे नियोजन नागपुरच्या पंतानी आखले आहे.

         राज्याभिषेक दिन हा बहुजन  मराठ्यांचा स्वातंत्र्यऊत्सव होता तो हिंदुत्वाचा व राजकिय पदे मिळवण्याचे विचारपीठ कधी झाले समजलेच नाही. जसे दिल्लीच्या रामलीला मैदानावरुन आण्णा हजारेंच्या आंदोलनातुन सत्ता परिवर्तन हे नियोजित केले तसेच काही आत्ता रायगडावरिल राज्याभिषेक सोहळ्याच्या आडुन आरक्षणाच्या खांद्यावर बंदुक ठेवत राज्यात सत्तापरिवर्तनाचा डाव रचलेला आहे. देवेंद्र फडणविस सत्तेत येण्याआधी रायगडावर निमंत्रण नसतानाही राज्याभिषेक सोहळ्याला गेले होते. त्यावेळी देवेंद्र फडणविसांना कुणीही बसायला खुर्ची देखील दिली नव्हती. तेव्हा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनीच स्वताची खुर्ची देवेंद्र फडणविस यांना दिली. त्याच वेळी भाजपाकडुन ओबीसी मतदार दुर गेला होता. आत्ता देवेंद्र फडणविसांना मराठा समाजाच्या सपोर्ट सिस्टिमची आवशक असल्याचे लक्षात आले. म्हणुन त्यांनी 2016 साली राज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर तेथे कोट्यावंधी रुपयांची हवेत ऊडत्या घोषणा केल्या. व एकाच हँलीक्रँप्टर मधुन संभाजी राजे व फडणविस गेले. त्याच हवाई प्रवासात राजेंना खासदारकी द्यायची ठरली. दिल्लीच्या पदापायी राजे देखील विसरले की आपण छत्रपती आहोत . शरद पवारांनी त्याच वेळी वक्तव्य केले की पुर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणुक करित होते आत्ता पेशव्यांनी छत्रपतींची नेमणुक केली. तर जेष्ट पत्रकार महाराव यांनी तर खासदार म्हणजे छत्रपतींच्या पायातील जोडे ऊचलणारा ठेवलेला गडी अशा कडक शब्दात सागिंतले होते. त्यानंतर राज्यात आरक्षण व कोपर्डी च्या मुद्यावरुन मराठा क्रांती मुक मोर्चा आंदोलनाची सुरवात झाली. त्या आंदोलनात मराठ्यांनी संभाजीराजेंचे नेतृत्व नाकारले कारण त्यांना भाजपाच्या शिफारसीने खासदारकी मिळाली होती. राजकीय नेतृत्व स्विकारले नाही. आत्ता पुढिल वर्षात संभाजी राजेंच्या खासदारकीची मर्यादा कार्यकाळ संपत आहे. पुन्हा खासदारकी मिळालीच पाहिजे या हट्टासाटी मराठा व्होट बँक माझ्या हातात आहे. हा दबाव टाकुन खासदारकिची बँटरी रिचार्ज करण्याचे काम सध्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या विचारपिठावरुन सुरु आहे.


      दुसऱ्या बाजुला राज्यात 2019 ला सत्तापरिवर्तन झाले . सेना भाजपा ही हिदुंत्ववादी विचारांचे दोन्ही पक्ष विभागले यांच्या व्होट बँक सुध्दा विभागली गेली. भाजपाच्या हिंदुत्वावर प्रश्न निर्माण झाले. शिवसेना पक्षामुळे भाजपाचा मोठा मतदार दुरावला गेला. काँग्रेस राष्ट्रवादी सेना यांची महाविकासा आघाडी तयार झाली . शिवसेनेमुळे भाजपाचा घसरलेला टक्का भरुन काढण्यासाठी संभाजी राजेंना पुढे करुन रायगडाच्या मातीवरुन गलिच्छ राजकारण देवेंद्र फडणविस यांनी खेळण्याचे डावपेच आखले. रिव्हिव पिटिशन दाखल करुनही आरक्षण मिळणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण रिव्हिव पिटिशन दाखल केली तरी खंडपीठ तेच राहते न्यायाधिश तेच राहतात. पाच न्यायधीश सदस्यांच्या जागी सात होतील , नऊ होती पण पुर्वीचे पाच सदस्य तेच राहतात. अन पहिला दिलेला निकाल परत बदलुन देणे म्हणजे हे एखाद्या न्यायाधिशाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होणारे आहे. कोणताच न्यायधिश हा एकदा दिलेला निकाल बदलत नसतो कारण त्याच्या बुध्दीवर देखील माध्यंमे प्रश्न निर्माण करु शकतात. रिव्हिव पिटिशन ने आरक्षण मिळणार नाही हे माहित असतानाही आरक्षणावरुन राजकारण अजुन पाच पंचवीस वर्ष खेळता आले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षणावरुन वापरता आले पाहिजे याच बेगडी हेतुने सध्या देवेंद्र फडणविस यांच्याच सांगण्यावरुन राज्यात संभाजी राजे , नितेश राणे , विनायक मेटे ,  हर्षवर्धन पाटिल , नरेंद्र पाटिल ,प्रसाद लाड यांना राज्यभर दौरे करित आहेत. मराठ्यांनी अजुन कित्या पिढ्या आरक्षण आंदोलनात बरबाद करायच्या तीन पिढ्या झालं तरी आरक्षण मिळत नाही . केवळ खासदारक्या आमदारकी व महामंडळे घेण्यासाठी आरक्षण नावाच्या शिडीचा वापर वरिल सर्वांनी केला. पुन्हा आरक्षणाचं आंदोलन पेटवायचे व राज्यात राजकिय अस्थिरता निर्माण करायची हाच तो देवेद्र पंताचा ऊद्देश आहे. कारण मराठा क्रांती मोर्चा ज्या पध्दतीने निघत होते त्याची दखल जगाने घेतली . देवेंद्र फडणविसांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची धोक्यात होती . वर्षा बंगल्यापासुन ते दिल्ली पर्यंत सर्वांना घाम फुटला होता. कोणत्याही क्षणी खुर्ची जायची भिती होती. पण मराठा समाजाने कधीच राजिनाम्याची मागणी केली तर आरक्षणाची मागणी केली होती. त्याच मोर्चात भाजपाचेही लोक नाईलाजाने सामिल झाले. सत्ता जाण्याची भिती होती. त्याकाळात देवेंद्र फडणविसांना राजिकय त्रास झाला याचा बदला म्हणुन आत्ता देखील यासत्ताधाऱ्यांना मराठा आरक्षणाच्या खांद्यावर बंदुक ठेऊन त्रास द्यायचा याची गाठ देवेंद्र फडणविस यांनी बांधली आहे व याची जबाबदारी संभाजीराजे , विनायक मेटे , नितेश राणे , हर्षवर्धन पाटिल , विखे पाटिल , नरेंद्र पाटिल या मराठा नेत्यांवर टाकली. भाजपामधील मराठ्यांच्या मागे मराठा समाज जात नाही हे लक्षात आल्यावर देवेंद्र फडणविसांनी संभाजीराजे यांना छत्रपतींचे वंशज म्हणुन आरक्षणाच्या लढ्यात पुन्हा ऊतरवले. छत्रपती या शब्दाखाली समाज भावनिक होऊन संभाजीराजेंच्या मागे आला पाहिजे व त्याची नंतर व्होटींग बँक निर्माण झाली पाहिजे ही कल्पना देवेंद्र फडणविसांचीच आहे.

  जातीचे व अस्मितेचे ऊत्सव ..आंदोलने कधी राजकीय झाली हेच लोकांना समजले नाहीत. चौंडी येथे महादेव जानकर ३१ मे रोजी अहिल्या देवी होळकर यांच्या विचारांचा जागर घालत होते. त्या विचारपिठालाही आमदारकी मिळाली. दलित समाजाची व्होटींग बँक जवळ राखण्यासाठी सतत रामदास आठवले यांना पदांची खिरापत देणं , आरक्षण चळवळीत काहीही योगदान नसलेले नरेंद्र पाटिल यांना महामंडळ देणे , विनायक मेटेंना आमदारकी देणं , संभाजीराजेंना खासदारकी देणं , गोपिचंद पडळकरांना आमदारकी देणं , या वरिल सर्व गोष्टी म्हणजे जे हाँटेल चांगल चालत त्या हाँटेलचा आचारी फोडायचा व ते हाँटेल बंद पाडायचे व ग्राहक आपल्या खानावळीकडे वळवायेे असा धुर्त विचार बाकी काही नाही . यांच्या मागिल जनता आपल्याला व्होटींग बँक म्हणुन वापरता आली पाहिजे म्हणुन जडणघडण होत असलेली नेतृत्वं फोडा त्यांना आमदारक्या खासदारक्या दान करा व चळवळी मोडित काढा अन समाज लाचार व गुलाम बनवा हा निकृष्ट दर्जाचा विचार देवेंद्र फडणविसांकडे तो पंरपरेने आला आहे. कारण तोडाफोडा व राज्य करा ही निती पेशव्यांनी इंग्रजांना शिकवली होती. तिच निती सध्या राज्यात खेळली आहे. भाजपाकडुन ओबीसी लांब गेला शिवसेनेमुळे हिंदुत्वाच्या मतांवर परिणाम झाला. तो टक्का भरुन काढण्यासाठी आत्ता मराठे जवळ करण्यासाठी देवेंद्र पंतानी आरक्षण नावाचं गोंडस नाव वापरलेलं कार्ड वापरले आहे.


  *राज्याभिषेक दिन साजरा करण्यास सुरवात कुणी केली?*

       ज्या राज्याभिषेक दिना च्या रायगड सोहळ्यावरुन संभाजीराजे खासदारकीची बँटरी चार्जिंग करित आहेत . तो सोहळा कुणी साजरा केला. हे देखील पाहणं गरजेचं आहे. राज्याभिषेक १९९४ सालापासुन साजरा होतोय पण तो तिथीनुसार होता. त्यानंतर तो २००६ ला निनाद बेडेकर यांनी तारखेच्या राज्याभिषेक दिनाला विरोध केला. त्याच साली संभाजी राजे रायगडावर येण्याआधीच अभिषेक सुरु केला होता. तेथील ऊपस्थित असलेले इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी अभिषेक थांबवला अन ऊपस्थित ब्रम्हवृंदाना सागितले की संभाजी राजे येत आहेत. त्यांच्या हस्तेच अभिषेक करुया . त्यावेळी ब्रम्हवृंद म्हणाला कोण छत्रपती अभिषेक आम्हीच घालणार तो अधिकार त्यांना नाही. असे म्हणताच तेथे थेट काँलर धरुन तलवारी हातात घेऊन मराठा व ब्रम्हवृंद असा वाद झाला. याच राज्याभिषेकाला संभाजीराजेंना पुजेला बसायचाही अधिकार येथील व्यवस्थेने नाकारला होता. तो अधिकार मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ने संभाजीराजे यांना पुन्हा मिळवुन दिल्याचे अनेक विचारवंताचे व इतिहासकारांचे स्पष्ट म्हणने आहे.  २००६  इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी अ.भा.शिवराज्याभिषेक ऊत्सव समिती रायगड ही समिती स्थापन केली. २००८   नंतर तारखेनुसार म्हणजेच सहा जुनला साजरा व्हायला लागला.


चौकट-३

   *राज्याभिषेक दिन शिवरायांचा आहे , युवराज संभाजीराजेंचा नाही!*

   2009 नंतर राज्याभिषेक दिन साजरा करण्यास प्रचंड वाढ झाली. पंचवीस हजारांवर रायगडावर मावळे गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करित असताना अतिशय पध्दतशीरपणे युवराज संभाजीराजेंनी स्वताला या सोहळ्यातुन प्रकाशझोतात आणले. शिवरायांचा राज्याभिषेक दिन आहे. युवराजांचा नाही . तरिही पोस्टरवर स्वताला जास्त जागा घेणं . सोशलमिडियातुन शिवरायांचा जागर कमी पण स्वताचाच ऊदोऊदो जास्त करणं . स्वता वाजत गाजत येणं छत्रपती या नावाखाली लोकांना भावनिक करणं या गोष्टीत संभाजीराजे अतिशय माहिर आहेत.


   *रायगडावर शिवरायांचा पुतळा बसवण्यात संभाजीराजेंचे योगदान काय ?*

     २००८ सालापर्यंत रायगडावर शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता. अ.भा. शिवराज्याभिषेक सोहळा समितीने पुतळा बसवण्याची मोहीम आखली . पहिल्यांदा तेथे फायबरचा पुतळा बसवला . परवानगी नसल्याने तो पुन्हा काढला गेला. रायगडावरील मेघडंबरीत पंचधातुचा पुतळा बसवयाची मोहिम पुन्हा आखण्यात आली. २००९ साली ५ जुनला सकाळी ६ वाजता शिवरायांचा सिहांसनावर बसलेला पंचधातुचा पुतळा सावंत व राहुल भोसले यांच्या टिमने रायगडाच्या पायथ्याला आणला . पोलिसांना खबर मिळाली. तब्बल ८५० किलो वजनाचा पुतळा पंचवीस ते तीस जनांच्या टिम ने लोखंडी चँनलचा वापर करित तो पुतळा खांद्यावर साडेचार तासात गडावर राजसदरेवर आणला . तेथे पुतळा  बसवला गेला. तत्कालिन मुख्यमंत्री  अशोक चव्हाण व ऊपमुख्यमंत्री आर.आर पाटिल होते. सरकारने पुतळ्याला परवानगी नसल्याने काढायला सागिंतला . इंद्रजीत सावंत यांनी स्थानिक तत्कालिन आमदार माणिकआबा जगताप व विचारवंत पुरषोत्तम खेडेकर यांना बोलवले. आ.माणिक जगताप देखील मैदानात ऊतरले व पुतळा काढण्यास विरोध दाखवला तर पुरषोत्तम खेडेकर यांनी देखील पुतळा काढला तर अशोक चव्हाण यांचा बंगला जाळु अशी टोकाची भुमिका घेतली. काँग्रेस आमदार माणिकआबा जगताप यांनी तत्कालिन प्रधानमंत्री व तत्कालिन मुख्यमंत्री यांना फोनवरुन सागिंतले की पुतळा काढला तर सरकार कोसळेल . पुतळ्याला हात लावु नये. सरकार ने पुतळा काढण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. तसे पत्र थेट समितिचे अध्यक्ष इंद्रजित सावंत यांच्याकडे आजही आहे. रायगडावरिल मेघडंबरीत बसवलेला पुतळ्याला काढण्यासाठी पुन्हा फडणविस सरकारने प्रयत्न केले पण इंद्रजित सावंत यांनी ते प्रयत्न हाणुन पाडले. आजही त्या पुतळ्याला कायदेशीर परवानगी नाही. तो पुतळा केवळ शिवप्रेमींच्या भावनेपोटी तेथे आहे. त्या पुतळ्याला कायदेशीर परवानगी मिळणे अतिशय काळाची गरज आहे. अन्यथा आरक्षण काढले तसे कायद्यावर बोट ठेऊन पुन्हा पुतळ्यावर राजकारण करायला हे राजकिय मंडळी मागेपुढे पाहणार नाहीत.  मेघडंबरीत सिंहासनावर बसलेला पुतळा आहे त्यात संभाजीराजे यांचे योगदान काय असा प्रश्न निर्माण होत आहे.



*मोदींनी भेट नाकारली तर राष्ट्रपतींकडे संभाजीराजेंनी तक्रार का केली नाही?*

    संभाजी राजे यांना सर्वप्रथम राजवाड्यातुन बाहेर शिवशाहु यात्रेत संभाजी ब्रिगेड ने काढले. छत्रपती रयतेच्या भेटीला असे म्हणत त्यांना स्वखर्चाने राज्यात फिरवले. व विचारांचा जागर घातला. त्यानंतर आरक्षण लढ्यात ते पुढे आले. भाजपाने नेहमीप्रमाणे नेतृत्व करणाऱ्याला पद दिले. संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त खासदारकी मिळाली. मी कोणत्याही पक्षाचा खासदार नाही मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. असे सतत राजेंना सागांयची वेळ आली. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चार वेळा संभाजी राजे यांना मराठा आरक्षणावर भेटायला नकार दिला ,वेळच दिली नाही. हे स्वताच नैराश्याने संभाजी राजे यांनी सागिंतले . जर संभाजी राजे राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत. राष्ट्रपती पद हे देशात सर्वोच्च पद आहे. तर प्रधानमंत्री भेटत नाहीत  वेळ देत नाहीत याची तक्रार राष्ट्रपती यांच्याकडे संभाजीराजे यांनी का केली नाही. तो त्यांचा आधिकार आहे. राष्ट्रपतींकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न  किती वेळा मांडला? सर्वोच्च न्यालयाच्या निकालानंतर राष्ट्रपतींकडे आपण कोणत्याही निर्णयाच्या विरोधात आपिल करु शकतो हा सविंधानिक आधिकार आहे. जसे की एखाद्या आरोपीला फाशी शिक्षा जाहिर केल्यानंतर तो राष्ट्रपतींकडे दाद मागु शकतो. राष्ट्रपती त्यावर तोडगा काढु शकतात. तर मग सर्वोच्च न्यालयाच्या निर्णायावर संभाजी राजे राष्ट्रपतींकडे का भेटले नाहीत. यावर संभाजी राजे यांच्याकडे ऊत्तर आहे का ?


*राज्य दौऱ्यात संभाजी राजेंची भाजप नेते सक्रिय याचा अर्थ काय ?*

     आपल्या खासदारकीची पुढिल वर्षात कार्यकाळ संपणार असल्याने पुन्हा सक्रिय होत संभाजी राजे यांनी राज्य दौऱ्याची आकणी केली. सोलापुर  दौऱ्यावर आले तेव्हा त्यांच्या शेजारी भाजपाचे आमदार सुभाष देशमुख होते. औंरगाबाद दौऱ्यात त्यांच्या सोबत भाजपाचे आमदार पदाधिकारी नाष्ट्याला सोबत होते. पत्रकारांनी प्रश्न विचारला की हे भाजपाचे आमदार पदाधिकारी तुमच्या सोबत कसे तर ते म्हणाले एकाच हाँटेलात थांबलो होतो योगायोगाने भेट झाली. पत्रकारांनी सागिंतले राजे ते स्थानिक नेते आहेत त्यांचे येथे बंगले आहेत ते नाष्ट्याला हाँटेलात का थांबतील असा युक्तीवाद झाला. राजेंनी प्रश्नाला बगल दिली. राज्यात संभाजी राजे शरद पवारांनाही भेटले , देवेंद्र फडणविस व प्रकाश आंबेडकरांनाही भेटले . राज ठाकरेनांही भेटले . जेवढ्या व्यक्तींना भेटले ते सर्व व्यक्ती राजकिय होते. संभाजी राजे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी  कायदेपंडिताची गरज आहे. प्रश्न न्यायालयात आहे . विधानसभेत नाही तो संसदेच्या आवारात आहे. संभाजी राजे यांनी माजी न्यामुर्ती बी जे कोळसे पाटिल यांची भेट घेतली नाही. डाँ.आ.ह. साळुंखे यांची भेट घेतली नाही. नानासाहेब जावळे पाटिल यांची भेट घेतली नाही. किशोर चव्हाण यांना भेटले नाहीत. शशिकांत पवार यांना भेटले नाहीत. पुरषोत्तम खेडेकरांना भेटले नाहीत. मनोज आखरे यांना ते भेटले नाहीत . प्रविणदादा गायकवाड यांना ते भेटले नाहीत. मराठा संघटनांची अडचशे लोकांची समन्वय समिती आहे त्या समितीला ते भेटले नाहीत. मग संभाजी राजे भेटले कुणाला तर राजकिय पुढाऱ्यांना भेटले. कारण मिडिया त्याशिवाय दखल घेत नाही. राज्य दौऱ्यात भाजपा नेत्यांशी जवळिकता हे स्पष्ट दिसते. तसेच चंद्रकांत पाटिल यांनी तर आंदोलन जाहिर होण्याआधीच संभाजीराजे यांना जाहिर पाठिंबा दिला आहे. शिवसेनेमुळे दुरावलेला हिंदु मतदार भाजपाला पुन्हा जवळ करायचा असल्याने संभाजी राजे हे नाव पुढे येत आहे असे जानकरांचे मत आहे.



   *देवेंद्र फडणविसांकडुन स्वताच्या राजिकय संरक्षणासाठी  मराठ्यांचा वापर*

   देवेंद्र फडणविस भाजपाचे प्रदेशअध्यक्ष व असताना रायगडावर आले होते. त्यांना अतिशय हिन वागनुक त्यावेळी मिळाली होती. बसायला खुर्चीही लवकर मिळाली नाही. देवेंद्र फडणविस यांना चांगले माहित होते की छत्रपती या शब्दाशी मराठ्यांचे भावनिक नाते आहे. याचाच फायदा देवेंद्र फडणविसांनी ऊचलला . पुर्वी भाजपाचं राजकारण ब्राम्हण ओबीसी दलित असे होते. प्रमोद महाजन , गोपिनाथ मुंडे  आत्ता ते देवेंद्र फडणविसांनी बदलले . कारण भाजपाच्या हातुन ओबीसी निसटला होता. दलितही दुर गेला. 

 जर राजकारणात जिवंत राहायचे असेल तर सोबत एक लढवय्यी जमात असनं गरजेचं आहे हे देवेंद्र फडणविसांना माहित होते म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक एक मातब्बर मराठा नेते देवेंद्र फडणविसांनी गळाला लावले. पुर्वीचा फँक्टर बदलत ब्राम्हण -मराठा- ओबीसी - दलित असा फँक्टर राबवला. सगळ्यावर ब्राम्हण देवेंद्र फडणविस , त्यानंतर मराठ्यांचे विखे पाटिल , मोहिते पाटिल , राणा पाटिल , राणे , हर्षवर्धन पाटिल , संभाजीराजे , राजे महाराजे घराण्यातील पण सरंक्षण म्हणुन शिपाई म्हणुन वापरले . त्यानंतर ओबीसी मधील महादेव जानकर त्यांच तोंड दाबण्यासाठी गोपिचंद पडळकर  ओबीसी नंतर दलित समाज सोबत राहावा म्हणुन रामदास आठवले यांना सोबत ठेवायचे. अशी ऊतरंड राजकारणात पाहायला मिळाली. पण यात सर्वाधिक वापर हा मराठ्यांचा होताना दिसतोय. केंद्रातुन एक प्रस्ताव बहुमतात मंजुर केला तर दोन दिवसात आरक्षण मिळु शकते तरी सुध्दा अद्याप एकदाही केंद्रात एकाही खासदाराने मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडला नाही. अतिशय हुशारीने मराठ्यांचा वापर राजकीय संरक्षणासाठी करताना देवेंद्र फडणविस दिसत आहेत.



कोकणचे सुधिर भोसले व सोलापुर बावीचे सुनिलबप्पा मोरे यांच्यावर झाले होते गुन्हे दाखल

    2001 साली मराठा सेवा संघाने राज्यात जिजाऊ रथ यात्रा काढली. तेव्हा पुरषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणचे सुधिरराजे भोसले व सोलापुरचे बावीचे सुनिलाबप्पा मोरे यांच्या टिम ने पुढाकार घेऊन रायगडावर सर्वात पहिल्यांदा शिवरायांचा पुतळा बसवला होता. स्थानिक तहसिलदार यांनी तो पुतळा जप्त केला. पुन्हा तहसिलवर मोर्चे निघाले. परत तो पुतळा बसवला गेला. त्याच्या सात दिवसानंतर प्रशासनाने तो पुतळा परत काढुन घेतला. २००१ साली चिपळुन कोकण येथील अनेक तरुणांनी पुढे येत तारखेनुसार राज्याभिषेक दिन साजरा करण्यास सुरवात केली होती. यात प्रामुख्याने सुधिरराजे भोसले यांची टिम पुढे होती. त्यावेळी तारिख व तिथी यावरुन बराच वाद झाला. 2002-2004 या वर्षात तेथील स्थानिक भाजपा सेनेच्या व सनातन संस्थेच्या अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तारखेनुसारच्या राज्याभिषेक दिनाला विरोध केला. अनेकवेळा समोरसमोर कार्यकर्ते भिडले देखील. सोलापुर जिल्ह्यातुन त्यावेळी सुनिलबप्पा मोरे पंचवीस चार चाकी गाड्या भरुन रायगडावर असायचे. 2003 साली १४ आँगस्ट रोजी रात्री पडत्या पाऊसात वीर बाजी पासलकर यांचे वंशज विकास पासलकर यांनी पंचवीस कार्यकर्ते सोबत घेत शिवरायांचा पुतळा रायगडावर बसवला होता. तो पुतळा पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रशासनाने ताब्यात घेतला.

त्यानंतर राज्यात जेम्स लेन माध्यमांतुन जिजाऊ शिवरायंची बदनामी झाली.नंतर भांडारकर प्रकरण घडले. शेकडो कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल झाले. तेव्हाही संभाजी राजे यांचे कुठेच योगदान नव्हते. रायगडावर जे राज्याभिषेक दिनाला सार्वभौम विचारपिठ निर्माण झाले त्याचा वापर आत्ता राजकिय पदावर आरुढ होण्यासाठी होत आहे. इतिहासातील दिनाचे ऊत्सव हे राजकारणासाठी नसुन ते प्रेरणा घेण्यासाठी असतात.


( लेखक हे राजकिय व सामाजिक विश्लेषक तसेच इतिहासावर प्रसिध्द व्याख्याते आहेत)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या