संत चोखोबारायांच्या अभंगातील घुसखोरी | Infiltration of Saint Chokhobaraya's abhanga ... ...

                  अबिर गुलाल उधळीत रंग l या अभंगाचा पेटीवर परिचय देने सुरु होते. एक मोठे संगीतकार आपल्या विद्यार्थ्यांना तो अभंग वेगवेगळ्या पद्धतीने गाउन दाखवत होते.


अबिर गुलाल उधळीत रंग l

नाथा घरी नाचे सखा पांडुरंग ll


             एका विद्यार्थ्याने म्हनण्याचा प्रयत्न केला.त्याला थांबवत गुरुजी म्हनाले, "अभंग चोखोबांचा आहे.भावविभोर होऊन गायला हवा.अगदी उत्कटता दिसली पाहिजे."


         पोरगा चेहऱ्यावर उत्कटता आणु पहात  होता आणि मी पयारीला उत्कट भाव घेवुन उभा असलेला चोखोबां डोळ्यासमोर अनत होतो.


उंबरठ्याशी कैसे शिवु आम्ही जातीहीन l

रुप तुझे कैसे पाहु त्यात आम्ही दीन ll


            पांडुरंगाच्या पायरीला उभा राहुन चोखोबा आर्जवं करत वास्तवाचे भान करुन देत आहे. सांग पांडुरंगा उंबरठ्याला कसे शिवु ?आम्हाला तु हिन जातीचे केलेस.सांग विठोबा तुझे रुप कसे पाहु? आम्ही दिन आहोत.


          इकडे संगित विषयाचे गुरुजी हरकती काढत होते आणि हरकत कशी काढावी हे खुबीने सांगत होते.आणि मी विचार करत होतो ,काय हरकत होती चोखोबांना मंदिरात घेतले असते तर.जगबुडी येनार होती का ? मधेच गुरुजी ओरडले लय सोडु नका.त्यांना विद्यार्थ्यांनी लय सोडलेली अवडत नव्हती आणि मला चोखोबाची ती अर्त करुणा सहन होत नव्हती.तो सुद्धा मर्यादांची पायरी ओलांडत नव्हता.

पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग l


       "आरे वर जा वर , उरचा स्वर घे " ,  सर ओरडले.मी ही मनात ओरडलो "अरे चोखोबा जा ना वर,वर जा,घे वरची भूमिका.आरे तुझा बंका बरा,शिव्या घालतो तो.काय रे ही केलवानी आर्जव.चढ रे चोखोबा ती पायरी, कर बंड "  


वाळवंटी गाऊ आम्ही , वाळवंटी नाचु l

चंद्रभागेच्या पानने आम्ही अंग अंग न्हाऊ ll


        याला मंदिरात जा म्हनालो तर हा वाळवंटात गेला चंद्रभागेच्या तिरी किर्तनाला . बघ ती जनी शिव्या घालते रे चोखोबा, अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या.तुझी रांडरंडकी होवो,तुझे मढे बसो. आणि तु तर हार मानलीस.पायरी चढण्या ऐवजी वाळवंटात गेलास तिकडे.


सांगिताचे सरही विद्यार्थ्यांना असेच रागवले लय का सोडुन गेले म्हणून .


विठ्ठलाचे नाम घेवु होऊनी निसंग l


        या चोखोबाला कोनाचाच संग नाही म्हणून म्हनतो होऊनी निसंग.अरे काय हे जीने.घुस ना त्या संतमंडळात. तुझ्या भक्तीबद्दल आम्हाला काहीही शंका नाही. बघ तिकडे नामदेव आहेत ,जनाबाई आहेत, संत गोरा कुंभार आहेत , संत कबिर आहेत , संत सावता महाराज आहेत.


आषाढी कार्तीकी भक्तजन येती l

पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ll

चोखा म्हने नाम घेता भक्त होती दंग l


     माझे मन लागेना , मी बाहेर आलो . विचार करु लागलो , वारकरी सांप्रदायात नाथ फक्त एकनाथ महाराजांना म्हणतात. मग या अभंगातले नाथ तेच का ?

नाथाच्या घरी पांडुरंगाने पाणी भरल्याचे,घरची कामे केल्याचे मी आइकलेय.पण तो नाचल्याचे एकले नाही.आणि नाथमहाराजांना हा नाचलेला अवडेल का ? बरे ? चोखोबांच्या नंतर ३०० शे वर्षांनी हे नाथ महाराज होऊन गेले.चोखोबा आधीच हे कशाला म्हनतील. नाथा घरी नाचे सखा पांडुरंग ? म्हणजे हे ते नाथ नव्हेत.

मग मी विचार करु लागलो , पांडूरंगाने चोखोबांचे ढोरे ओढले , त्याने जनी सोबत शेनाच्या गवऱ्या लावल्या , त्याने सज्जन कसायासोबत मांस विकले , तो कबिरासोबत शेले विनायचा मग तो नाचला कुणाकडे ..


          अरे हो तो नामदेवांच्या किर्तनात नाचला.तो दोन जनांच्या सोबत नाचला एक मिरे सोबत पद घुंगरू बांध के आणि दुसरा नामदेवांच्या किर्तनात.

संत जनाबाईच म्हनतात

नामदेव कीर्तन करी l पुढे देव नाचे पांडुरंग ll


कोण्यातरी घुसखोराने नामा घरी नाचे सखा पांडुरंग चे नाथा घरी केले . संत चोखोबारायांनी नामाघरीच लिहीले असनार.संत नामदेवांची विठ्ठलभक्ती , घरातील ते उत्साही  वातावरण बघुन संत चोखोबाराय नक्कीच म्हनाले असतील नामा घरी नाचे सखा पांडुरंग. त्यांनी नाथांचे घरच पाहिले नाही तर कशाला म्हनतील नाथा घरी नाचे सखा पांडुरंग ? 


     म्हणजे अभंगातील नामा काढुन नाथा कुणीतरी घुसवले तर .कारण चोखोबाराय नामदेवांना नाथ म्हनतच नव्हते.तसा उल्लेख कुठेच नाही. तिथे नामाच असायला हवे. नाथा नव्हे.


मी भानावर आलो म्हनालो " काय ही दुर्दशा रे चोखोबा तुझी, मरण्यापूर्वीही आणि मेल्यानंतरही. "  


ह.भ.प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर

9970744142


♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या