नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यातील विविध विकास योजना या लाभधारकापर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे केलेल्या कार्यवाहीची आढावा घेणारी बैठक डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती. Review meeting of direction committee for coordination of DPDC
बैठकीत सुरवातीला मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन व त्यास मान्यता देण्यात आली. यावेळी समितीच्या सदस्यांनी प्रशासकीय पातळीवर येत असलेल्या अडचणी सांगून त्या दूर करण्याची मागणी केली. याचबरोबर आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार यांनी जिल्हा प्रशासनास सूचना केल्या. अध्यक्ष खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणीसाठी संबंधित यंत्रणेने त्वरीत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सूचनांचे स्वागत करुन उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत वस्तूस्थिती सभागृहाला अवगत करुन दिली. Review meeting of direction committee for coordination of DPDC

0 टिप्पण्या